मुंबई, ता. १ ऑगस्ट २०२४
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज हवामान विभागाने मुंबईसह कोकणात, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे,प्रवास टाळण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज सविस्तर...
गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र पुण्यामध्ये पावसाची हलकी बरसात सुरूच आहे. तसेच सांगली, कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर कमी झाला आहे. अशातच दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पुढील चार दिवस म्हणजेच १ ते ४ ऑगस्ट या काळात राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुण्यासह विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.