Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचे फटाके, CM शिंदेच्या 'त्या' निर्णयामुळे भाजप नेते नाराज

Andheri Vidhan Sabha News : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून महायुतीत काहीसा तणाव निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचे फटाके, CM शिंदेच्या 'त्या' निर्णयामुळे भाजप नेते नाराज
Eknath Shinde , Devendra Fadnavis, Ajit PawarSaam TV
Published On

लोकसभेनंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, जागावाटपाआधीच तिन्ही पक्षांमध्ये वादाचे फटके फुटत आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून महायुतीत काहीसा तणाव निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचे फटाके, CM शिंदेच्या 'त्या' निर्णयामुळे भाजप नेते नाराज
Maharashtra Politics : मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का, CM शिंदेंनी टायमिंग साधलं; बड्या नेत्याला शिवसेनेत घेतलं

सध्या अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ (Andheri Assembly Constituency) शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. ऋतुजा लटके या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. अंधेरी पूर्वच्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने निरीक्षक देखील नेमलाय.

त्यातच समाजसेविका स्वीकृती शर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात (Shivsena Eknath Shinde) केला प्रवेश केलाय. त्या अंधेरी पूर्वमधून विधानसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वीकृती शर्मा या वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

कारण, अंधेरी पूर्वची ही जागा महायुतीत आपल्याला मिळाली, असं भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. या जागेवर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आज बुधवारी संध्याकाळी भाजपचे अंधेरी पूर्व विधानसभेतील सर्व पदाधिकारी बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख अशी सर्वांची तातडीची बैठक देखील घेणार आहेत.

या बैठकीला आमदार अमित साटम हे मार्गदर्शन करणार आहेत. याच बैठकीत अंधेरी विधानसभा निवडणूक भाजप लढवणार असा दावा देखील केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे. या जागेवरून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचे फटाके, CM शिंदेच्या 'त्या' निर्णयामुळे भाजप नेते नाराज
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, अजित पवारांनी गेम केला; शिवसेनेचा विश्वासू नेताच फोडला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com