Snake Bite
Snake BiteSaam tv

Snake Bite : शेतात काम करणाऱ्या दोन महिलांना सर्पदंश; दोघांची प्रकृती गंभीर

Jalgaon News : दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत
Published on

यावल (जळगाव) : पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शर्ट असल्याने साप बाहेर येत असतात. यामुळे बऱ्याचदा कानाकोपऱ्यात जाऊन साप बसतात. तर शेतात देखील अडगळीच्या ठिकाणी गवतात साप असतात. दरम्यान शेतात काम करत असताना दोन महिलांना सापाने दंश केल्याची घटना यावल तालुक्यातील निमगाव येथे घडली आहे. यात दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. 

Snake Bite
Jamner News : विजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा मृत्यू; विद्युत पोलवर काम करताना घडली घटना

यावल (Yawal) तालुक्यातील निमगाव येथील सिंधुबाई प्रभाकर चौधरी (वय ५०) या शेतात काम करीत होत्या. दरम्यान, शेतात काम करीत असताना त्यांच्या हाताला (Snake Bite) सर्पाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तसेच अंबापाणी येथील शेतशिवारात गुलजारीबाई बारेला (वय ५२) ही महिला देखील काम करीत असताना त्यांच्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना देखील यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. 

Snake Bite
Palghar Zp School : शिक्षण हक्क कायदा कागदावरच; जिल्हा परिषद शाळेत केवळ ५ विद्यार्थी हजर

येथे दोन्ही महिलांवर प्रथमोपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने दोघाना तातडीने पुढील उपचारासाठी (Jalgaon Medical collage) जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com