

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. तुषार राठोड यांची निवड झाली.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुरुवातीला बी. आर. कदम आणि मारोतराव कवळे यांची नावे चर्चेत
तुषार राठोड यांच्या नावाची एंट्री झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट
संजय सूर्यवंशी, साम प्रतिनिधी
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शेतकरी विकास पॅनलची सत्ता आल्यानंतर आज 10 ऑगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडले गेले. खासदार अशोक चव्हाण यांनी या संदर्भात नुकतीच नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेतली. त्यानंतर चव्हाण यांना आलेल्या एका फोनमुळे अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट आला. नांदेड बँकेच्या अध्यक्षपदाची निवडीची इनसाइड स्टोरी जाणून घेऊ.
नांदेड बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल या शर्यतीत बी. आर. कदम, मारोतराव कवळे ही दोन नावे होती. यात भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नावाची भर पडली आहे. त्यांच्या नावाची शिफारस थेट मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्याची चर्चा होती. अखेर त्याचा खुलासा झालाय.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल दणदणीत विजय मिळवत 23 जागे पैकी सर्वाधिक जागा जिंकल्या. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल निवडणूक लढवली. संचालकांपैकी 11 संचालक हे सुरुवातीला बिनविरोध करण्यात आले. 12 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.शेतकरी विकास पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या.
बँकेच्या अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली होती. अनेक दिग्गज नेत्यांची नावे समोर आल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांना केला. आमदार तुषार राठोड यांना बँकेचे अध्यक्ष पद द्यावे अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना केल्या.
फडणवीस यांच्या सूचनेनुसार बँकेच्या अध्यक्षपदाची माळ मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार तुषार राठोड यांच्या गळ्यात टाकण्यात आली तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नेत्या मीनल खतगावकर यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.