Nanded Bus Stand: मराठी बोलत नाही जा! मुजोरपणा करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप| Video Viral

Hindi Language Controversy: नांदेडच्या बस स्थानकात सार्वजनिक शौचलयात काम करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीचा मुजोरपणा मनसे सैनिकांनी उतरवलाय. मराठी बोलत नाही काय करायचे ते कर असं म्हणून दम देणाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.
Nanded Bus Stand
MNS workers confront a man at Nanded bus stand for refusing to speak MarathiSaamtv
Published On

संजय सूर्यवंशी, साम प्रतिनिधी

मराठीत बोलत नाही, जा काय करायचे ते कर असा मुजोरपणा करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ नांदेड बस स्थानकावरील आहे. राज्यात हिंदी-मराठी भाषावाद पेटत चाललाय. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातही हा भाषावाद दिसून येत आहे.

मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या परप्रांतीयांना चोप दिला जातोय. जे परप्रांतीय मुजोरपणा करत आहेत, मराठी भाषा बोलण्यास नकार देत आहेत, त्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून चोप दिला जातोय. नांदेडमध्येही मनसैनिकांनी मुजोरपणा करणाऱ्याला चांगलाचा धडा शिकवलाय. नांदेड बस स्थानकात असलेल्या शौचालयात महिलांकडून पाच रुपये शुल्क आकारले जात होते. त्याचा जाब काही प्रवाशांना विचारला, त्यावेळी सदर व्यक्ती हा हिंदी भाषेत हुज्जत घालत होता. त्याला तेथील लोकांनी मराठीत बोलण्यास सांगितले.

पण त्यांने मुजोपणा दाखवत मराठीत बोलत नाही काय करायचं ते करा असा उलटा दम देऊ लागाला. परप्रांतीय व्यक्तीच्या मुजोरपणाचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज नांदेडमधील मनसे कार्यकर्त्यांनी त्या परप्रांतीय व्यक्तीचा चांगलाच क्लास घेतला. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या आणि हिंदी भाषेत दम देणाऱ्या उत्तर भारतीय व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी माफी मागायला लावली.

"दोनदा जय महाराष्ट्र म्हणा, नाहीतर आम्ही तुम्हाला बिहारला पाठवू..."

मुंबईच्या घाटकोपरमध्ये एका उत्तर भारतीय महिलेला मराठी न बोलल्याबद्दल माफी मागायला लावल्याची घटना घडलीय. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी परप्रांती महिलेला मराठी बोलायला लावले. मराठी न बोलता आल्यानं तिला माफी मागायला लावलीय. "दोनदा जय महाराष्ट्र म्हणा, नाहीतर आम्ही तुम्हाला बिहारला पाठवू..." असं एका मनसेच्या महिला कार्यकर्त्यानं तिला सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी या महिलेचा तिच्या हॉटेलमध्ये काही मराठी महिलांशी वाद झाला होता. याच वादादरम्यान उत्तर भारतीय महिलेने मराठी महिलांना ठणकावून सांगितलं होतं की, तुम्ही काहीही करा, मी मराठी बोलणार नाही. महिलेच्या या विधानामुळे मराठी महिलांना संताप आला. यानंतर हे प्रकरण मनसे कार्यकर्त्यांकडे आले. त्यानंतर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी बिहारच्या महिलेला घेरत तिला माफी मागायला लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com