Shocking : आई की कसाई? २२ दिवसांचा चिमुकला दुर्धर आजाराने ग्रस्त; आईने अंधश्रद्धेतून दिले बाळाच्या पोटावर चटके

nagpur Shocking : २२ दिवसांचा चिमुकला दुर्धर आजाराने ग्रस्त होता. आईने अंधश्रद्धेतून बाळावर उपचार करण्यासाठी त्याच्या पोटावर चटके दिले.
nagpur news
nagpur Saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुरात एका महिलेने अंधश्रद्धेचा कळस गाठला आहे. हृदयाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या 22 दिवसांच्या चिमुकल्याला अंधश्रद्धेतून आईने चक्क पोटावर चटके दिल्याचा प्रकार समोर आला होता. याच चिमुकल्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. हृदयावर जटिल शस्त्रक्रिया करून बाळाचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आई-वडिलांवर गुन्हा दाखल झाल्याचं कळल्यावर पुढाकार घेतला. प्रशासन आणि पोलिसांना सूचना दे रुग्णलायत उपचारासाठी पाठवण्याच्या सूचना दिल्यात. यानंतर बाळावर डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करत त्याच्या जीव वाचवण्यात यश आले.

nagpur news
Bengaluru Murder case : पुण्याचं जोडपं, बेंगळुरुत सुटकेस हत्याकांड; मध्यरात्री नेमकं काय घडलं? घटनाक्रम वाचा

अमरावती जिल्ह्याचे मेळघाट या दुर्गम आदिवासी भागामधील सिमोरी गावात २२ दिवसांचं बाळ असताना सातत्याने श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं सातत्याने रडत होते. त्याच्या बाळाचा आईने अंधश्रद्धेपोटी विळ्याने 65 चटके दिल्याची बाब उघडकीस आली. अंधश्रद्धेतून केलेल्या प्रकारामुळे चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या बाळाला अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

nagpur news
Eknath Shinde Song : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...; कामराला शिंदे गटाचा जबरा उत्तर, उद्धव ठाकरेंवरही बाण, VIDEO

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ही बाब करतात त्यांनी मुलाला उपचारासाठी नागपुरातील एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. 22 दिवसांच्या बाळाच्या अंगावर चटके दिले होते. बाळाची प्रकृती गंभीर असताना छातीत इन्फेक्शन झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करणे कठीण होते. सुरुवातीला त्याच्या छातीत झालेल्या संक्रमण कमी करण्यासाठी डॉक्टराच्या टीमने 10 दिवस उपचार केले.

nagpur news
Prashant koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला; कोर्टाबाहेरील थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

त्यानंतर बाळाच्या हृदयावर जटील अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दहा दिवस लोटले असून बाळ आता बरं झालेलं आहे. बाळ दूध सुद्धा प्यायला लागलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसात बाळाची सुट्टी होणार असल्याचं सुद्धा डॉक्टरकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com