रेल्वे ट्रॅक उखडू, विमान उडू देणार नाही, ९० लाख मराठे मुंबईत धडकणार; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा

Manoj Jarange Patil Issues Strong Warning To Maharashtra Government : मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत येईल, असा दावा त्यांनी केला.
Manoj Jarange Patil  Issues Strong Warning  To Maharashtra Government
Maratha reservation protest intensifies as Manoj Jarange Patil strongly reacts to new rules for protestssaam tv
Published On
Summary
  • दक्षिण मुंबईतील आंदोलनांच्या नव्या नियमांवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक

  • मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होईल, असा दावा जरांगे पाटील यांनी केला.

  • मराठा आरक्षण आंदोलन आणि सरकारमधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

अक्षय शिंदे, साम प्रतिनिधी

मुंबईत ९० लाख मराठे मुंबईत घुसतील. तुम्ही काय करता ते बघू घेऊ. आम्ही रेल्वे पण फिरू देणार, नाही विमान उडू देणार नाही. सगळ्या रेल्वे पटऱ्या उखडून टाकू. यावेळी मराठे 45 लाख गाडी घेऊन मुंबईत घुसणार आहेत, असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. दक्षिण मुंबईतील मोर्चे आणि आंदोलनांबाबत नवे नियम लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर जरांगे-पाटील आक्रमक झालेत.

Manoj Jarange Patil  Issues Strong Warning  To Maharashtra Government
Mumbai Protest: जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच सरकारकडून झटका? मुंबईत आंदोलनासाठी नवे नियम जारी

यावेळी जरांगे पाटील यांनी मुंबईत भगवं वादळ धडकणारच, असं म्हणत आम्हाला कोण अडवतंय, ते बघतोच, असा इशारा दिलाय. मराठ्यांना आंदोलनापासून रोखण्याचा निर्णय सरकारनं घेणं यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण होतोय. ज्या जनतेनं, ज्या मराठी जनतेनं त्यांना सत्तेत बसवलंय, त्यांना हे सरकार मुंबईत येण्यापासून रोखतंय.

जनतेनं सत्ता दिली, कायदा हातात दिला आणि सरकार त्यांचा उपयोग जनतेच्या विरोधात करतंय. सरकार सत्तेचा गैरवापर करतंय, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय. ज्यांना आपलं म्हणून सत्तेत बसवलंय, आपले फडणवीस, आपले शिंदे म्हणून त्यांना सत्ता दिली, तेच आता आम्हाला मुंबईत येऊ नका असा म्हणत आहेत. सत्ता म्हणजे काय पाच मिनिटे टिकू देणार नाही, अशा गंभीर इशारा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलाय.

Manoj Jarange Patil  Issues Strong Warning  To Maharashtra Government
Manoj Jarange: मुंबईत पुन्हा आरक्षणावरून संघर्ष; आंदोलनासाठी मनोज जरागेंचं पोलिसांना पत्र

सरकार दादागिरी करत आहे, पण आम्ही त्याला दाद देत नाहीत, त्याला जुमानत आहे. मात्र आम्ही कायदा नक्कीच मानतो, त्यामुळे मुंबईत येणारच. त्यासाठी आधीच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी मागितलीय. आंदोलनाचे परवानगी निवेदन आधीच देण्यात आलंय. जर परवानगी दिली नाही तर तुम्ही कायद्याचा सन्मान करत नाही हे सिद्ध होतं. पण मुंबईत आम्ही येणारच तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ. आमचं ठरलंय, मी जाणार रात्रंदिवस बसणार तुम्ही काय करणार ते आम्ही बघणार, तुम्ही मुंबईत कसे अडवतात हे पण बघतो, असा जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारला दिलाय.

तुम्हाला मुंबईत अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा, तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही सत्तेतही बसायचं नाही. मुंबईतील बांधवांनी समजून घ्या, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का तर एखाद्या वेळेस नक्की होईल आम्हाला दहा-पंधरा दिवस सांभाळून घ्या, आम्ही तुमचेच आहे लोकाचे नाही, असं आवाहनही जरांगेंनी मुंबईकरांना केलंय.

मुख्यमंत्र्यांना गंभीर इशारा

तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केलेला आहे, आता पुन्हा फडणवीस नादाला पडायचं नाही, आता आम्ही सावध आहोत. तुमच्यावर सगळ्यांचा राग आहे. दादागिरी करायची नाही. आम्ही आंदोलन आझाद मैदानला करणार, शिवाजी पार्कला करणार वर्षापुढेही करणार सगळ्या दुनियात करणार. जिथे आम्हाला रोड दिसेल तिथे आंदोलन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नादी लागू नका माझ्या. पोलिसांच्या जीवावर तुम्ही खेळ खंडोबा करायचा काम करू नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com