Manoj Jarange: मुंबईत पुन्हा आरक्षणावरून संघर्ष; आंदोलनासाठी मनोज जरागेंचं पोलिसांना पत्र

Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलनाची तयारी करत आहेत. २९ ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी मुंबई पोलिसांना पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे.
Maratha Reservation Protest
MARATHA RESERVATION PROTEST: MANOJ JARANGE WRITES TO MUMBAI POLICEsaam tv
Published On
Summary
  • मनोज जरांगे २९ ऑगस्टला मुंबईत मराठा आरक्षण आंदोलन

  • मराठा आरक्षणासाठी जरांगेंचे पोलिसांना पत्र

  • मुंबईत मराठा आरक्षणावरून पुन्हा आंदोलनाची तयारी

मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी जरांगे पुन्हा एकदा मराठा आंदोलकांसह मुंबईत धडक देणार आहेत. त्यामुळे मुंबईत मराठा आरक्षणावरून कसा संघर्ष पेटणार ? 29 ऑगस्टला जरांगेंनी आंदोलन करण्याचा पवित्रा का घेतलाय? भाजप नेत्यांनी जरांगेंना काय प्रत्युत्तर दिलंय ?पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या जरांगेंनी गनिमी कावा आता उघड झालाय...कुणबी दाखल्यांसाठी 29 ऑगस्टला करण्यात येणारं आंतरवाली सराटीतलं आंदोलन आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भगवं वादळ मुंबईत धडकणार असून मुंबईत पुन्हा एकदा आरक्षणाला संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी आझाद मैदानातील आंदोलनाच्या परवानगीसाठी पोलिसांना पत्रही लिहलयं. हे पत्र साम टिव्हीच्या हाती आल्यानं जरांगेंचा पुढची रणनीतीही समोर आलीय. या पत्रात नेमकं काय लिहलयं.पाहूयात.

Maratha Reservation Protest
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

29 ऑगस्टला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनासाठी आझाद मैदान मराठी आंदोलकांना उपलब्ध करून देण्यासाठी हमी पत्र जरांगेंनी दिलयं. आंदोलनात 5 हजारहून अधिक मराठा बांधव सामील होणार असल्याचीही जरांगेंनी माहिती दिलीय. मराठा- कुणबी नोंदी वैध ठरवण्यासाठी आरक्षण उपसमितीनं दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन असल्याचंही पत्रात जरांगेंनी सांगितलयं

Maratha Reservation Protest
मनोज जरांगे पाटलांच्या अडचणीत वाढ? कोट्यवधीची जमीन खरेदी केली, जरांगेंच्या निकटवर्तीयाविरोधात थेट ईडीकडे तक्रार

तसचं सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थानचे गॅजेटियर लागू करणं आणि अमंलबजावणी करण्याची मागणी मराठा आंदोलकांची असल्याचंही जरांगेंनी पत्रात नमुद केलयं. आंदोलनादरम्यान वाहतुकीला अडथळा होणार नाही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राखली जाईल असे अनेक दावेही पत्रात करण्यात आले आहेत. दरम्यान जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर मुंबईत थेट अर्ज दाखल झाल्यानं राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आलीय. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी याप्रकरणी जरांगेंवर जोरदार टीका केलीय.

ऑगस्ट 2025मध्ये मुंबईतील आंदोलनावेळी 5 दिवस मराठ्यांनी आझाद मैदानासह मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन केली होती. लाखो आंदोलक मुंबईत आल्यानं प्रशासकीय व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला होता. सरकारही या आंदेलनामुळे मेटाकुटीला आलं होतं. त्यात आता 29 ऑगस्टचं अंतरवाली सराटीत ठरलेलं आंदोलन जर मुंबईत झालं तर राज्य सरकारसह पोलीस प्रशासनापुढे मोठं आव्हानं निर्माण होऊ शकतं. त्यामुळे पोलीस जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देणार का? राज्य सरकार जरांगेंना मुंबई येऊ देणार की आधीच तोडगा काढणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com