मनोज जरांगे पाटलांच्या अडचणीत वाढ? कोट्यवधीची जमीन खरेदी केली, जरांगेंच्या निकटवर्तीयाविरोधात थेट ईडीकडे तक्रार

Manoj Jarange Patil In Trouble : मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांविरोधात बेनामी मालमत्ता आणि कोट्यवधींच्या जमीन व्यवहारांचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आंदोलनाच्या आडून बेनामी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Manoj Jarange Patil In Trouble
Manoj Jarange Patil Controversy: Ajay Maharaj Barskar Makes Serious Allegations Over Land Dealssaam tv
Published On
Summary
  • ईडी आणि आयकर विभागाकडे तक्रार दाखल केली.

  • मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांवर बेनामी मालमत्तेचे आरोप.

  • कोट्यवधी रुपयांच्या जमीन खरेदी व्यवहारांबाबत चौकशीची मागणी.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. मात्र त्यांच्या आंदोलनाआधी मनोज जरांगे पाटील अडचणीत अडकण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय पांडुरंग वसंतराव तारक यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय (ED) आणि आयकर विभागाकडे थेट लेखी तक्रार दाखल केली आहे. आंदोलनाच्या आडून कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता आणि उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा गंभीर आरोप बारस्कर यांनी या तक्रारीत केला आहे.

Manoj Jarange Patil In Trouble
Manoj Jarange : मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; सव्वा तास बंद दाराआड काय चर्चा झाली?

तक्रारीत काय आहे?

अजय महाराज बारस्कर यांनी मुंबई ईडी कार्यालयाकडे सादर केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, पांडुरंग वसंतराव तारक हे मनोज जरांगे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून सार्वजनिकरीत्या ओळखले जातात. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य होती. त्यांच्या घराचे साधे प्लास्टर करण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते, अशी स्थानिक पातळीवर चर्चा होती.

Manoj Jarange Patil In Trouble
Manoj Jarange Patil | आतापर्यंत झालं नाही त्याहून मोठं आंदोलन करू- मनोज जरांगे पाटील

पारंपरिक शेतीव्यतिरिक्त त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही मोठे कायदेशीर किंवा अधिकृत साधन नाहीये, परंतु, मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत तारक यांच्या जीवनशैलीत आणि मालमत्तेत संशयास्पद आणि अवाढव्य वाढ झाली. याप्रकरणी अजय महाराज बारस्कर यांनी ईडीकडे तक्रार केली आहे.

या तक्रारीतील पाच प्रमुख मागण्या :

पांडुरंग वसंतराव तारक व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेची केंद्रीय यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी

त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांची आणि बँक खात्यांची सविस्तर तपासणी करण्यात यावी.

नुकत्याच खरेदी केलेल्या ९.०८ हेक्टर शेतीसाठी वापरण्यात आलेल्या पैशांचा मुख्य स्रोत तपासण्यात यावा.

आवश्यकतेनुसार त्यांचे बँक खाते, आयकर विवरणपत्र आणि मालमत्ता व्यवहारांची चौकशी व्हावी.

या व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग बेहिशेबी मालमत्ता, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आढळून आल्यास संबंधित कायद्यांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com