Manoj Jarange: मराठ्यांनो मुंबईकडे निघा, पाहुण्यांकडे राहा; मनोज जरांगेंनी सांगितला आंदोलनाचा संपूर्ण प्लान

manoj jarange patil on fadnavis government: मनोज जरांगे पाटील हे मुंबई येण्यावर ठाम आहेत. आज त्यांनी मराठा बांधवांसोबत संवाद साधत त्यांना मुंबईकडे निघा असे आवाहन केले.
Manoj Jarange: मराठ्यांनो मुंबईकडे निघा, पाहुण्यांकडे राहा; मनोज जरांगेंनी सांगितला आंदोलनाचा संपूर्ण प्लान
manoj jarange patil Saam Digital
Published On
  • मराठ्यांनो मुंबईकडे निघा, पाहुण्यांकडे जाऊन राहा

  • मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आवाहन

  • मनोज जरांगेंनी आज सांगितला मुंबईतील आंदोलनाचा प्लान

  • मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना मुंबईला जाण्याचे आवाहन केले

  • १२ सप्टेंबरपूर्वी मुंबईला जाण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारला इशारा दिला. 'उपोषण सोडणार नाही, मुंबईत जाणारच', असं स्पष्ट शब्दात त्यांनी सरकारला सांगितले. मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधत त्यांना आजपासूनच मुंबईकडे निघा आणि पाहुण्यांकडे जाऊन राहा, असे आवाहन केले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपण मुंबईमध्ये जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी यावेळी सर्व मराठा बांधवांना मुंबईला जाण्याच्या तयारीला लागा असे आदेश दिले.

मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना आज मुंबईला जाण्याचा संपूर्ण प्लान सांगितला. ते म्हणाले की, सरकारकडून कुणीही संपर्क साधलेला नाही. मी उपोषण सोडणार नाही आणि मुंबईत जाणारच. जमेल तसं मराठ्यांनी मुंबईकडे निघावे. मित्रांकडे- पाहुण्यांकडे जाऊन राहावे. १२ तारखेपर्यंत मुंबईला जा आणि घाबरू नका. १२ तारखेंच्या २ -४ दिवस आधी हळूहळू टप्प्या टप्प्याने पुढे जा. मराठे मुंबईत आले हे समजले नाही पाहिजे. सगळे माझ्यासोबत येऊ नका त्यामुळे आधीच त्यांनी पुढे जावे.'

Manoj Jarange: मराठ्यांनो मुंबईकडे निघा, पाहुण्यांकडे राहा; मनोज जरांगेंनी सांगितला आंदोलनाचा संपूर्ण प्लान
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या संतापाचा उद्रेक; शिंदे-फडणवीसांचं नाव घेत दिला निर्वाणीचा इशारा

मनोज जरांगेंनी मराठ्यांना आवाहन केले की, 'वाशी, पनवेल, कल्याण-भिवंडीला आपली खूप लोकं आहेत. २ ते ३ दिवसांत मुंबईतील आपल्या लोकांना शोधा आणि त्यांच्याकडे जाऊन राहा. १२ तारखेला आम्हाला अडवले तर मुंबईत गेलेले मराठे तरी तयार राहतील. फक्त आझाद मैदानावर जाऊ नका. पोलिसांना आपल्याला त्रास द्यायचा नाही. टाईमपास करू नका. आपल्या गाड्यांना झेंडा लावून मुंबईकडे निघा. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही.' या वेळी मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, 'भ्रष्टाचारी लोकांना भाजपमध्ये घेतलं हे संविधानिक आहे का?'

Manoj Jarange: मराठ्यांनो मुंबईकडे निघा, पाहुण्यांकडे राहा; मनोज जरांगेंनी सांगितला आंदोलनाचा संपूर्ण प्लान
Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com