Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या संतापाचा उद्रेक; शिंदे-फडणवीसांचं नाव घेत दिला निर्वाणीचा इशारा

Manoj Jarange warning to Eknath Shinde and Devendra Fadnavis : मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेत मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठण्याचा इशारा दिलाय.

भरत नागणे, पंढरपूर | साम टीव्ही

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तुम्हाला गर्व आणि अहंकार झाला आहे. तो उतरावायला वेळ लागणार नाही. जमिनीवर पाय ठेवायलाही जागा राहणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

अजूनही वेळ गेली नाही. मराठा समाजाची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे आणि शिरसाट यांनी आपली चूक सुधारावी. मराठा समाज हा त्यांचा हक्काचा व्होटर आहे. तो हातातून जाण्याआधी चूक सुधारावी, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

चार प्रमाणपत्रांचा विषय आहे. त्याचा इतका विषय ताणण्याची गरज नाही. विषय साधा आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी समजून घेऊन हा विषय सोडवला पाहिजे. या राज्याची मालक जनता आहे, तुम्ही नाही. तुम्हाला फक्त गर्व आणि अहंकार झाला आहे. अहंकार उतरायला वेळ लागणार नाही. तुम्हाला जमिनीवर पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही. संपूर्ण राज्यात तुमच्या विरोधात खदखद आहे. तुमच्या जवळचे पाच-पन्नास कार्यकर्ते तुमचे ऐकतात; म्हणजे संपूर्ण राज्य तुमचं ऐकत नाही. एकदा जर का विरोधाला विरोध सुरू झाला तर अवघड होणार असल्याचेही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com