मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव गाडीनं आधी दोघींना उडवलं, नंतर कार 25 फूट खड्ड्यात उलटली

Ratnagiri Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील लवेल येथे भरधाव कारने पायी जाणाऱ्या दोन मुलींना धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार २५ फूट खोल खड्ड्यात उलटली. दोन्ही मुलींवर लवेल येथील घरडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ratnagiri Accident :
Mumbai Goa Highway accident two girls seriously injured in Ratnagirisaam tv
Published On
Summary
  • रत्नागिरी खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

  • लवेल येथे भरधाव कारने दोन मुलींना उडवल्याची घटना

  • दोन मुलींना धडक दिल्यानंतर कार २५ फूट खोल खड्ड्यात उलटली

अमोल कलये, साम प्रतिनिधी

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातून एक भीषण अपघात घडलाय. या घटनेत महामार्गावरून पायी प्रवास करणाऱ्या दोन मुलींना भरधाव कारने भीषण धडक दिली. मुलींना धडक दिल्यानंतर कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट 25 फूट खोल खड्ड्यात उलटली. मुंबई-गोवा महामार्गावर लवेल येथे ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Ratnagiri Accident :
Accident News: भरधाव कारने मुलाला चिरडलं; 9 वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू, मुंबईतील थरारक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील लवेल येथून दोन मुली पायी चालत जात होत्या. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या कारने दोन मुलींना जोरदार धडक दिली. त्यामुळे त्या दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातानंतर दोन्ही मुलींची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर लवेल येथील घरडा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Ratnagiri Accident :
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! कार अन् दोन रिक्षांची एकमेकांना धडक, भीमाशंकरला गेलेले १२ भाविक गंभीर

दरम्यान, दोन मुलींना धडक दिल्यानंतर कार महामार्गाच्या कडेला असलेल्या सुमारे वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यात कोसळली. या कारमध्ये प्रवास करणारे चौघे जण देखील गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप तरी कुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी लवेल येथील घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनियंत्रित कार रेलिंग तोडून ट्रॅफिक पोलिसांच्या चौकीत घुसली

बेलापूर परिसरात एक अनियंत्रित कार रस्त्यावरील लोखंडी रेलिंग तोडून थेट ट्रॅफिक पोलिसांच्या चौकीच्या आवारात घुसली. कारने चौकीजवळील एका खोलीच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने भिंत तुटली. माहितीनुसार, किया सोनेट कार क्रमांक एमएच ४६ बीव्ही २१५२ चा चालक कार भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com