Accident News: भरधाव कारने मुलाला चिरडलं; 9 वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू, मुंबईतील थरारक घटना

Speeding Car Hits Child in Mumbai: मुंबईतील वांद्रे परिसरात भरधाव कारच्या धडकेत ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. मेहेबूब स्टुडिओ परिसरातील या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
Speeding Car Hits Child in Mumbai
Mumbai Bandra accident 9 year old boy killed by speeding carsaam tv
Published On
Summary
  • ९ वर्षीय मुलाचा भरधाव कारच्या धडकेत मुंबईत मृत्यू

  • वांद्र्यात भरधाव कारने ९ वर्षांच्या मुलाला धडक दिली

  • मेहेबूब स्टुडिओ परिसरातील भीषण अपघाताची घटना

मुंबईतींल वांद्र्यात एका भरधाव कारनं नऊ वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडलीय. मेहेबूब स्टुडिओच्या परिसरात हा अपघाताचा थरार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु मुलाचा मृत्यू झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, कार चालक महिला होती. कार चालवताना ही महिला मोबाईल फोनवर बोलत होती.

Speeding Car Hits Child in Mumbai
Badlapur : बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अपघात; सलामी देत असतानाच सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा खाली कोसळला

मुंबईच्या वांद्रे भागात भरधाव कारने ९ वर्षांच्या अंश गुप्ताला चिरडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, मी घटनास्थळावर जेवण घ्यायचा गेलो होतो. त्यावेळी मला अपघात झाल्याचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर गाडीच पुढचं टायर मुलाच्या अंगावर होतं, त्यानंतर दुसर टायरवर पण मुलावर गेलं. हे दृश्य पाहताच मी धावत गेलो आणि गाडीला थांबवलं, असे एक प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तसेच मुलाने रस्ता क्रॉस केला नव्हता तो कडेनेच जात होता. पण तरीही महिला ड्रायव्हरने गाडी त्याच्यावर चढवली,असे देखील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Speeding Car Hits Child in Mumbai
Ambernath : "आम्ही सर्व काही मॅनेज करू" पोलिसांच्या नावाने ज्वेलर्सकडून ४ लाख रुपये खंडणी उकळली, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

कार एक लेडीज ड्रायव्हर चालवत होती आणि ती फोनवर बोलत होती.त्यामुळे तिला कळालं देखील नाही की तिच्या गाडीखाली कुणी आलंय. त्यानंतर मी मुलाजवळ गेलो तेव्हा त्याची स्थिती खुपच गंभीर होती. त्यानंतर त्याच गाडीतून आम्ही त्याला होली फॅमिली रुग्णालयात अॅडमीट केल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. खरं तर या अपघातात अंश गुप्ताचा मृ्त्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करायला सुरुवात केली आहे.

अनियंत्रित कार रेलिंग तोडून ट्रॅफिक पोलिसांच्या चौकीत घुसली

बेलापूर परिसरात एक अनियंत्रित कार रस्त्यावरील लोखंडी रेलिंग तोडून थेट ट्रॅफिक पोलिसांच्या चौकीच्या आवारात घुसली. कारने चौकीजवळील एका खोलीच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने भिंत तुटली. या अपघातात कारचेही नुकसान झाले आहे. माहितीनुसार, किया सोनेट कार क्रमांक एमएच ४६ बीव्ही २१५२ चा चालक कार भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. याप्रकरणी बेलापूर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com