Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! कार अन् दोन रिक्षांची एकमेकांना धडक, भीमाशंकरला गेलेले १२ भाविक गंभीर

Pune News: पुण्यातील भीमाशंकर रोडवर भीषण अपघात झाला. भरधाव कार आणि दोन रिक्षांमध्ये धडक झाली. या अपघातामध्ये १२ जण गंभीर जखमी झालेत.
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! कार अन् दोन रिक्षांची एकमेकांना धडक, भीमाशंकरला गेलेले १२ भाविक गंभीर
Pune Accident:Saam Tv
Published On
  • पुण्यात भीषण अपघाताची घटना

  • भीमाशंकर मार्गावर कार आणि दोन रिक्षांची भीषण धडक

  • भीमाशंकर दर्शनाला गेलेले १२ भाविक जखमी

  • अपघातात चार जणांची प्रकृती चिंताजनक

रोहिदास गाडगे, शिरूर

पुणे जिल्ह्यात भयंकर अपघाताची घटना घडली. कार आणि दोन रिक्षांची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये १२ जण गंभीर जखमी झालेत. यामधील ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना भीमाशंकर मार्गावर घडली. या अपघातामध्ये जखमी झालेले प्रवासी हे भाविक असून ते भीमाशंकरला श्रावण महिना असल्याने दर्शनासाठी गेले होते. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांचा सहभाग आहे. सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंचरहून भीमाशंकरकडे जाणाऱ्या कारची भीमाशंकरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन रिक्षांना धडक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षामधील भाविक गंभीर जखमी झाले. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कारमधील प्रवाशांनी मद्यसेवन केले असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून अपघाताचे नेमके कारण समोर आले नाही. पोलिस या अपघाताचा तपास करत करत असून तपासातूनच अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com