Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Manoj Jarange indefinite hunger strike in Antarwali Sarati : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं ठिकाण बदललं असून, आता अंतरवाली सराटीतच ते बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा फडणवीस-शिंदेंना लक्ष्य केलं. तसेच आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला.
मनोज जरांगे २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार, फडणवीस-शिंदेंवर गंभीर आरोप
manoj Jarange Patil Hunger Strikesaam tv
Published On

अक्षय शिंदे, जालना | साम टीव्ही

प्रकृती बिघडल्यानं मराठवाडा दौरा रद्द करावा लागल्यानंतर मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. २९ ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसणार होते. पण त्यांनी ठिकाण बदललं आहे. आता ते अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. प्रश्न निकाली निघाला नाही तर, उपोषण सुरू असतानाच, ते मुंबईकडे मोर्चा वळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

काही जणांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उठवली होती. यात आता आणखी एका मंत्र्याची भर पडली आहे. संजय शिरसाट जाणूनबुजून कुणबी प्रमाणपत्र रद्द करू लागले आहेत, असा सणसणाटी आरोप त्यांनी केला आहे.

उपोषणाचं ठिकाण बदललं

येत्या २९ ऑगस्टपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईत बेमुदत उपोषणाला बसणार होते. पण आता उपोषणाचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. २९ तारखेपासून अंतरवाली सराटीतच उपोषणाला बसणार आहेत. स्वतः जरांगेंनी ही माहिती दिली. प्रश्न जर सोडवला गेला नाही, तर उपोषण सुरू असतानाच मुंबईकडे निघणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

फडणवीस-शिंदेंना पुन्हा लक्ष्य

यावेळी मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं. त्यांच्यामुळेच उपोषणाची वेळ आली आहे, असा घणाघातही त्यांनी केला. प्रमाणपत्र रद्द केले. मग मी गप्प कसं बसणार, असा सवालही त्यांनी केला. मुंबईतील आंदोलनासाठी निवेदन देऊन ठेवलेले आहे. संजय शिरसाट हे जाणूनबुजून प्रमाणपत्र रद्द करायला लागले आहेत. त्यांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला. शिंदे आणि शिरसाट यांची मिलीभगत असेल. शिंदेंच्या सांगण्यावरूनच बैठका झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

मनोज जरांगे २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार, फडणवीस-शिंदेंवर गंभीर आरोप
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या संतापाचा उद्रेक; शिंदे-फडणवीसांचं नाव घेत दिला निर्वाणीचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com