मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil Slams Maharashtra Government: मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
MANOJ JARANGE PATIL SLAMS MAHARASHTRA GOVERNMENT, DEMANDS REMOVAL OF GYANESH KUMAR
MANOJ JARANGE PATIL SLAMS MAHARASHTRA GOVERNMENT, DEMANDS REMOVAL OF GYANESH KUMARsaam tv
Published On: 

जालना : नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही जोरदार टीका केली.

भाजप सरकारने ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांच्यात मिलीभगत आहे का, असा संशय आता बळावत असल्याचेही त्यांनी म्हटले. सरकारने ज्ञानेश कुमार यांना काढून टाकले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारवर टीका करताना जरांगे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी आणि दहशत आता लोकांना सहन होत नाही. घोषित हुकूमशाही सुरू असून सत्ताधाऱ्यांची जुलमी राजवट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार प्रचंड अन्यायकारी असल्याचेही जरांगे यांनी म्हटले.

MANOJ JARANGE PATIL SLAMS MAHARASHTRA GOVERNMENT, DEMANDS REMOVAL OF GYANESH KUMAR
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! सरकारचं मोठं आश्वासन; भविष्यातील पाणी, चारा...;

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरूनही जरांगे यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देऊन त्यांचे अश्रू पुसावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गावागावात चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधताना, मराठा समाज आरक्षणाची मागणी करू लागला की दादागिरी करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मला आणि मराठा आंदोलकांना प्रचंड त्रास दिला जात आहे. आता संयमाचा बांध तुटणारच आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

MANOJ JARANGE PATIL SLAMS MAHARASHTRA GOVERNMENT, DEMANDS REMOVAL OF GYANESH KUMAR
ठाकरे बंधूंच्या मोर्चावर भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट वार; SIR वरून विचारले ४ प्रश्न

जर जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवले असेल, तर तीच जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू शकते, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला. तसेच, मी सरकारचा मित्र होण्यासाठी तयार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मला सरकारपुढे झुकवण्यासाठी ज्या-ज्यावेळी डाव टाकले जातील, त्या-त्यावेळी मराठा समाजाने शंभरपट ताकदीने एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com