ठाकरे बंधूंच्या मोर्चावर भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट वार; SIR वरून विचारले ४ प्रश्न

Ravindra Chavan, Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पलटवार केला आहे. SIR प्रक्रियेवर विरोधकांना चार थेट प्रश्न विचारत त्यांनी मतदार यादी, घुसखोर आणि दुहेरी मतदानाच्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.
Ravindra Chavan, Garjana Morcha
Ravindra Chavan, Garjana Morcha
Published On: 

Ravindra Chavan four questions on SIR Maharashtra : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत SIR प्रक्रियेवर मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ शेअर करत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंच्या 'गर्जना मोर्चा'वर जोरदार पलटवार केला आहे. SIR प्रक्रियेला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि पक्षांना त्यांनी थेट सवाल केले आहेत. आशिष शेलार, नवनाथ बन यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून ठाकरेंच्या मोर्चावर प्रतिक्रिया देण्यात आल्या.

गृहमंत्र्यांचे संसदेतील मुद्दे अधोरेखित करत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे विरोधकांना काही प्रश्न विचारले. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे, हे घुसखोरांनी ठरवायचे का ? तसे झाले तर लोकशाही सुरक्षित राहील का ?

एका मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्याची मुभा असावी का ? मृत्यू पावलेल्या नागरिकांना मतदार यादीत स्थान असावे का ? SIR प्रक्रियेला विरोध करणाऱ्यांनी आधी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत आणि नंतरच विरोध करावा, असे थेट आवाहन रविंद्र चव्हाण यांनी या वेळी केले.

Ravindra Chavan, Garjana Morcha
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! मुंबई ते ठाणे प्रवास अवघ्या २५ मिनिटांत; MMRDA चा मोठा निर्णय

गर्जना मोर्चा नव्हे ही तर कोल्हेकुई, आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

निवडणुकीत विजय मिळाला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोग योग्य, मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आरोप करायचे, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. आजचा मोर्चा हा ‘गर्जना मोर्चा’ नसून ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या म्हणीला साजेसा कोल्हेकुई मोर्चा होता, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उत्तर दिले. शेलार म्हणाले की, आजचा मोर्चा पाहिल्यानंतर त्याचे नाव ‘गर्जना मोर्चा’ नसून ‘कोल्हे कुईचा मोर्चा’ असायला हवे, असे वाटते.

Ravindra Chavan, Garjana Morcha
भाजपला मोठा धक्का, उमेदवारी नाकारल्याने गडकरींचे खंदे समर्थक बंडाच्या तयारीत, पदवीधरमध्ये मोठा भूकंप

सीजेपीच्या झुरळांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडे पाठ फिरवली

काँक्रोज जनता पार्टीच्या अभिजित दीपकेंना विष्णूचा अवतार म्हणत उद्धवजी ठाकरेंनी डोक्यावर घेतलं. पण आजच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडे काँक्रोज जनता पार्टीनं दुर्लक्ष करत पाठ फिरवली. दीपकेंना विष्णूचा अवतार करूनही उपयोग झाला नाही. कालपर्यंत सीजेपीच्या प्रत्येक आंदोलनात घरचं लग्न असल्यासारखं उठबस करणाऱ्यांना आज अभिजित दीपकेंनी अक्षरशः फाट्यावर मारलं. एकही झुरळ या आंदोलनात फिरकलं नाही, असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com