दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! सरकारचं मोठं आश्वासन; भविष्यातील पाणी, चारा...;

Chandrashekhar Bawankule Reviews Drought Situation in Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. प्रशासनाने शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
DROUGHT-HIT FARMERS TO GET RELIEF BEFORE DIWALI
DROUGHT-HIT FARMERS TO GET RELIEF BEFORE DIWALIsaam tv
Published On: 

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेतल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. शेतीच्या पाहणीनंतर बावनकुळे यांनी शेताच्या बांधावरच शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून जेवण केले. यावेळी त्यांनी पिठलं, बाजरीची भाकरी, भरीत आणि ठेच्याचा आस्वाद घेतला. शेतकऱ्यांनी प्रेमाने वाढलेल्या या साध्या जेवणाचा त्यांनी स्वीकार केला.

DROUGHT-HIT FARMERS TO GET RELIEF BEFORE DIWALI
ठाकरे बंधूंच्या मोर्चावर भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट वार; SIR वरून विचारले ४ प्रश्न

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असतानाही त्यांनी आपुलकीने जेवण वाढल्याचे पाहून बावनकुळे भावुक झाले. शेतकऱ्यांच्या संस्कृतीत पाहुण्याचा सन्मान आणि आपुलकीला मोठे स्थान आहे, असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.

DROUGHT-HIT FARMERS TO GET RELIEF BEFORE DIWALI
राजकारणात मोठा भूकंप! भाजपने सोडली बंडखोर खासदारांची साथ; स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय

बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण तसेच कृषीपंपांना वीजजोडणी देताना, बँका आणि महावितरणे कोणतीही टाळाटाळ करू नये. शेतकऱ्यांच्या अर्जांकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वारंवार कागदपत्रांची मागणी करून नागरिकांना वेठीस धरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी करा-शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांच्या घरी जाऊन तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबवून एकही पात्र शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

DROUGHT-HIT FARMERS TO GET RELIEF BEFORE DIWALI
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह वीज केबल चोरीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आणि महावितरणने समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मुख्यालयी अनुपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि गतिमान पद्धतीने काम करावे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने तत्पर सेवा देण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com