Manoj Jarange : मनोज जरांगेंना गोळ्या घालणार, धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग...

Manoj Jarange Patil latest news : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा दावा करणारी कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून चौकशीची मागणी होत आहे.
Walmik Karad
Walmik Karad Saam tv
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Manoj Jarange Patil threat News : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची भाषा केल्याचा एक ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झालाय. कराड समर्थकाकडून ही मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे कॉलवर बोलताना समर्थकाने धनंजय मुंडे यांचेही नाव घेत धमकावल्याचे ऐकू येत आहे. या कॉल रेकॉर्डिंगची साम टीव्ही कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचे नाव घेण्यात आले आहे. सध्या ही कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमावरती व्हायरल होत आहे. संबंधित कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला बोलत असताना थेट मनोज जरांगे यांना मी गोळ्या घालून जिवे मारणार असल्याचे बोलत आहे. त्याचबरोबर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड म्हणायचे नाही, नसता तुलाही जीवे मारतो अशी जरांगे समर्थकालाही जिवे मारण्याची धमकी कराड समर्थकांनी दिली. ही कॉल रेकॉर्डिंग सध्या प्रचंड प्रमाणात सोशल माध्यमांवरती भरलं आहे.

Walmik Karad
Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, भाजप राष्ट्रीय प्रवक्त्याच्या आईला कारने उडवले, CNG पंपावरील व्हिडिओ व्हायरल

वाल्मीक कराड समर्थक आणि जरांगे समर्थकांमध्ये झालेले संभाषण...(साम टीव्ही याची पुष्टी करत नाही)

जरांगे समर्थक : पाटलांना काय करणार?

कराड समर्थक : मनोज जरांगे यांना कधी गोळ्या घालायच्या, मी स्वतः गोळ्या घालतो.

जरांगे समर्थक : तू घालणार आहेस का?

कराड समर्थक : स्वतः घालतो गोळ्या

जरांगे समर्थक : काय करणार आहेस तू पाटलांना...?

कराड समर्थक : मी तर मनोज जरांगे यांना जीवच मारतो....

जरांगे समर्थक : बरं चालतंय बर...

Walmik Karad
Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, प्रति तोळा इतक्या रूपयांनी महागलं, वाचा 24K,22K आणि 18K चा दर

मनोज जरांगे यांच्यासह जरांगे समर्थकाला फोनद्वारे धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मीक कराड यांचे नाव घेऊन धमकवल्याचेही ऑडिओ क्लिपमध्ये दिसतेय. तुझ्या %$#& जर गोळ्या नाही घातले तर मुंडे आणि वाल्मीक कराड पुन्हा म्हणायचे नाही, अशी धमकी दिली आहे.

Walmik Karad
जय-पार्थ पवारांची शरद पवारांसोबत महत्त्वाची बैठक, २ तास खलबतं, बारामतीत राजकीय घडामोडींना वेग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com