Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, प्रति तोळा इतक्या रूपयांनी महागलं, वाचा 24K,22K आणि 18K चा दर

24K 22K 18K gold price today : आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोनं प्रति तोळा ₹6,600 ने महागलं असून 22K आणि 18K सोन्याचे नवे दर व शहरनिहाय भाव जाणून घ्या.
Gold And Silver Rates
Gold And Silver RatesSaam Tv News
Published On

Today gold price in Mumbai Delhi Chennai : मागील आठवडाभरापासून सुरू असलेली सोन्याच्या दरातील पडझड आज थांबली आहे. बुधवारी सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिकन डॉलरमुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति तोळा ६६०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ६६० रूपये वाढली आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत आज प्रति तोळा १६०५३० रूपयांवर पोहचली आहे. तर प्रति ग्रॅम सोनं १६ हजार ५३ रूपयांवर गेलेय. मंगळवारी सोन्याची किंमत प्रति तोळा १५३९३० रूपये इतकी होती. आज यामध्ये ६६०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

भारतातील सोन्याचा भाव, प्रति ग्रॅम (Todays Gold Rate)

२४ कॅरेट - प्रति ग्रॅम ₹१६,०५३ (६६० रूपयांची वाढ)

२२ कॅरेट- प्रति ग्रॅम ₹१४,७१५ ( ₹६०५ ची वाढ)

१८ कॅरेट - प्रति ग्रॅम ₹१२,०४० ( ₹४९५ वाढ )

भारतातील सोन्याचा भाव, प्रति तोळा (Todays Gold Rate)

२४ कॅरेट - प्रति तोळा ₹१६०५३० (६६०० रूपयांची वाढ)

२२ कॅरेट- प्रति तोळा ₹१४७१५० ( ₹६०५० ची वाढ)

१८ कॅरेट - प्रति तोळा ₹१२०४०० ( ₹४९५० वाढ )

Gold And Silver Rates
Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, भाजप राष्ट्रीय प्रवक्त्याच्या आईला कारने उडवले, CNG पंपावरील व्हिडिओ व्हायरल

कोणत्या शहरात सोन्याचे दर काय आहेत ?

जागतिक बाजाराचा परिणाम भारतामधील सराफा बाजारवरही पडलाय. देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या दरांमध्ये शहरांनुसार बदल पाहायला मिळत आहे. चेन्नईमध्ये सोन्याचे भाव सध्या देशात सर्वाधिक उच्चांकावर आहेत. चेन्नईत आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१६,२५६ वर पोहोचला आहे, तर २२ कॅरेट आणि १८ कॅरेटसाठी ₹१४,९०० आणि ₹१२,७५० मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीतही सोन्याच्या दरात वाढ दिसून येत असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१६,०६८ इतका नोंदवण्यात आला आहे.

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह पुणे, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये सोन्याचे दर सारखे आहेत. या शहरांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१६,०५३ इतका आहे. या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्यासाठी ₹१४,७१५ आणि १८ कॅरेटसाठी ₹१२,०४० असा भाव सुरू आहे. अहमदाबाद आणि वडोदरा या शहरांमध्ये सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१६,०५८ वर पोहोचला आहे. या दोन्ही शहरांमध्ये २२ कॅरेटसाठी ₹१४,७२० आणि १८ कॅरेटसाठी ₹१२,०४५ इतका दर आहे.

Gold And Silver Rates
Ajit Pawar : विमान कोसळण्याआधी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल, १० मिनिटापूर्वी दादा नेमकं काय म्हणाले....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com