Sharad Pawar latest news : शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबाची बैठक पार पडली. या बैठकीला विश्वस्त मंडळ उपस्थितीत होते, अशी माहिती मिळाली. या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणावर चर्चा झालेली असू शकते, असा अंदाज काही जणांकडून लावला जातोय.
विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पवार कुटुंबीय आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त यांच्यात बैठक झाली. शरद पवार हे या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि दिवंगत अजित पवार हे विश्वस्त होते. अजित पवार यांच्या जागी विश्वस्त म्हणून पार्थ किंवा जय पवार यांना घेण्यात येणार आहे तर अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा झाल्याचे समजतेय. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित होण्यावर ज्या राजकीय चर्चा सुरू आहेत, त्यावर ही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शरद पवार आणि पार्थ पवार जय पवार हे एकत्र चर्चा करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांचा ज्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला होता, त्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जय पवार आणि शरद पवार यांनी पाहणी केली..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.