Manoj Jarange Patil big decision regarding hunger strike
Manoj Jarange Patil big decision regarding hunger strikeSaam TV

Manoj Jarange: मुंबईकडे निघण्यापूर्वी मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; भावुक होत म्हणाले, उपोषण २६ जानेवारीपासून नाही तर…

Maratha Mumbai Andolan: २६ जानेवारीपासून नाही तर अंतरवाली सराटीपासून मी आमरण उपोषण निर्णय घेणार आहे. हा निर्णय मी माझ्या समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
Published on

Manoj Jarange Mumbai Andolan

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज जालन्यातील अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने कूच निघणार आहे. त्यापूर्वी पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी सरकारला शेवटचा इशारा दिला आहे. चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत, लवकरच आरक्षणावर निर्णय घ्या, असं भावनिक आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil big decision regarding hunger strike
Maratha Aarakshan: मनोज जरांगे मुंबईत पोहचण्याआधीच मराठ्यांना आरक्षण मिळणार? पडद्यामागील हालचालींना वेग

आमचे पोरं जर मोठे करायचे असतील, तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही, असं देखील जरांगे यांनी ठणकावून सांगितलं आहे. मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation)  मिळालं हवं, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

२६ तारखेला राज्यातील सर्व मराठा बांधवांनी मुंबईला यावं, माझं शरीर मला साथ देत नाही. मी असेन किंवा नसेल, पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका, छातीवर गोळ्या पडल्या तरी आता माघार नाही, असंही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. आता २६ जानेवारीपासून नाही तर अंतरवाली सराटीपासून मी आमरण उपोषण निर्णय घेणार आहे. हा निर्णय मी माझ्या समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे. आता समाजाला जीव अर्पण करायचा आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाने आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ७ महिन्यांचा वेळ दिला. मात्र, अजूनही आरक्षण मिळाले नाही. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. मी असेल नसेल विचार जागे ठेवा, असे सांगताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले होते.

Manoj Jarange Patil big decision regarding hunger strike
Sharad Mohol Case: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची पोलिसांकडून धिंड; VIDEO होतोय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com