जरांगेंनी 500 कोटीचा बॉम्ब टाकला; ऑडिओ क्लिपने राजकारणात खळबळ, शिंदेंचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

Manoj Jarange Patil ₹500 Crore Audio Clip Controversy: मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींच्या आरोपांशी संबंधित ऑडिओ क्लिप समोर आणल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उदय सामंत, दादा भुसे आणि संजय शिरसाट यांनी चौकशीची मागणी केली आहे.
MANOJ JARANGE PATIL ₹500 CRORE AUDIO CLIP ROW
MANOJ JARANGE PATIL ₹500 CRORE AUDIO CLIP ROWsaam tv
Published On: 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बीडमध्ये नारायणगड येथे दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी भाजपला 500 कोटी रुपये घेऊन ते आपल्याला दिल्याचे सांगितल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. या आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट ऑडिओ बॉम्ब टाकला. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत मनोज जरांगेना 500 कोटी पोहोचवल्याचा उल्लेख आहे. तसेच भाजपकडून षडयंत्र रचले जात असल्याचा दावा देखील मनोज जरांगेंनी केला.

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची बदनामी करण्याचं षडयंत्र - उदय सामंत

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपवरून मंत्री उदय सामंत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करून आवाजाची सत्यता तपासली पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या क्लिपमध्ये भाजपशी संबंधित व्यक्ती असल्याचं सांगितलं जात असून, भाजपने याबाबत खुलासा करावा, असं आवाहनही सामंत यांनी केलं आहे. चांगल्या पद्धतीने सुरू असलेलं मराठा आंदोलन बदनाम करण्याचा किंवा ते चिरडण्याचा प्रयत्न झाला होता का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

MANOJ JARANGE PATIL ₹500 CRORE AUDIO CLIP ROW
Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडूंविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे. क्लिपमधील महिला नेमकी कोण आहे, तिचा भाजपशी काय संबंध आहे आणि या क्लिपमागे नेमकं काय आहे, हे तपासातून स्पष्ट झालं पाहिजे, अशी मागणीही सामंत यांनी केली. जरांगे पाटील आमच्याबद्दल बोलत असले, तरी त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

MANOJ JARANGE PATIL ₹500 CRORE AUDIO CLIP ROW
Maharashtra Government: 'लाडकी बहीण'नंतर महिलांसाठी आणखी एक योजना, फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

तीन वर्षांपासून हा विषय असेल तर थांबले का? - दादा भुसे

यावरच शिंदेसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनोज जरांगे यांना सगळे पुरावे पोलिस प्रशासनाला द्यावे, त्या पुराव्यांची पोलिस चौकशी करतील अशी प्रतिक्रिया दिली. जरांगे कोर्टात देखील चौकशीची मागणी करू शकतात. आम्ही देखील पाठपुरावा करू. चौकशीतून जे समोर येऊल, ते महाराष्ट्रासमोर असेल, असे दादा भुसे म्हणाले. तीन वर्षांपासून हा विषय असेल तर थांबले का? आत्ताच ती माहिती का समोर आली ? असा सवाल दादा भुसे यांनी विचारला.

MANOJ JARANGE PATIL ₹500 CRORE AUDIO CLIP ROW
Konkan Railway : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल; कुठे कुठे थांबणार? वाचा

दूध का दूध, पानी का पानी झालं पाहिजे - मंत्री संजय शिरसाट

मनोज जरांगे पाटील यांनी जे सांगितलं आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी झालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले. जी काही क्लिप आहे, त्यातील आवाजाची एकदा तपासणी झाली पाहिजे. या क्लिपमधील सर्वजण एकमेकांशी कॉन्फरन्स कॉलवर बोलत असल्याचं दिसत आहे. जरांगे पाटील म्हणत आहेत, त्याप्रमाणे हे एखादं ठरवून केलेलं षडयंत्र असेल, तर त्याची सत्यता समोर आली पाहिजे. मुळात जरांगे पाटील यांनी ही क्लिप दाखवून एक चांगलं काम केलं आहे. अशा प्रकारची षडयंत्रं रचली जातात, हे त्यांनी प्रसारित केलेल्या क्लिपमधून समोर आल्याचं दिसत आहे.

मात्र, आता प्रश्न असा आहे की, नेमकं हे षडयंत्र कोण कुणाच्या विरोधात रचत आहे? मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी हे केलं जात आहे की, एकनाथ शिंदे साहेबांना राजकीयदृष्ट्या नुकसान पोहोचवून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे? या दोन्ही शक्यता या क्लिपमधून समोर येत आहेत. राजकारण करताना अशा प्रकारचा गोंधळ घातला जात असेल किंवा षडयंत्र रचलं जात असेल, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीशी आम्हीही सहमत आहोत, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com