Bhimashankar Temple: श्रावणात भाविकांना मोठा दिलासा; पाच महिन्यांनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पूर्णवेळ खुलं

Bhimashankar Jyotirlinga: श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पूर्णवेळ खुले राहणार आहे. पहाटे ५ वाजता पूजेनंतर दर्शन सुरू होऊन रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
Bhimashankar Temple
Bhimashankar Templesaam tv
Published On

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलीये. गेल्या पाच महिन्यांपासून विविध कारणांमुळे बंद असलेलं पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आता भाविकांसाठी पूर्णवेळ खुलं राहणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मंदिरात केवळ मर्यादित वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध होती. मात्र श्रावणातील वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनाची वेळ आता वाढवण्यात आली आहे.

पहाटे पाच वाजता पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार असून रात्री दहा वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे दूरवरून भीमाशंकरच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Bhimashankar Temple
आरोग्य विभागात तब्बल 89 लाखांचा घोळ, अधिकाऱ्याच तडकाफडकी निलंबन

श्री क्षेत्र भीमाशंकर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या या मंदिराला धार्मिक महत्त्वासोबतच ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसाही लाभला आहे. मंदिराची वास्तू नागर शैलीतील असून, परिसरातील कोरीवकाम आणि शिल्पकला विशेष आकर्षण ठरतं.

Bhimashankar Temple
शेतकरी कर्जमाफी योजनेतून ९४ हजार शेतकऱ्यांना वगळलं; ४६ हजार ठरले अपात्र,काय आहे कारण?

श्रावण महिन्यात विशेषतः श्रावणी सोमवारच्या दिवशी भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. यापूर्वी मर्यादित दर्शन वेळेमुळे भाविकांची गैरसोय होत होती. आता मंदिर दिवसभर खुलं राहणार असल्याने गर्दीचं व्यवस्थापन करण्यासही मदत होण्याची शक्यता आहे.

Bhimashankar Temple
Kalyan Waterfall : पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत हरवून जायचंय, मग कल्याणजवळील 'हा' धबधबा तुम्ही पाहायलाच हवा

भीमाशंकर परिसर धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. मंदिराभोवती असलेले घनदाट जंगल आणि भीमाशंकर अभयारण्यामुळे या भागाचे महत्त्व आणखी वाढते. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला शेकरू या परिसरात आढळतो. त्यामुळे श्रावणात महादेवाच्या दर्शनासोबतच निसर्गरम्य भीमाशंकरचा अनुभव घेण्यासाठीही भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com