आरोग्य विभागात तब्बल 89 लाखांचा घोळ, अधिकाऱ्याच तडकाफडकी निलंबन

Beed Health Department Scam : बीडच्या जिल्हा हिवताप विभागात कर्मचाऱ्यांच्या एरिअर्सच्या रकमेत मोठी आर्थिक अनियमितता समोर आली आहे. सुमारे 89 लाख रुपयांच्या अतिरिक्त उचल प्रकरणी जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंह शिंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Beed Health Department Scam
Beed Health Department Scam
Published On
Summary
  • बीडच्या जिल्हा हिवताप विभागात आर्थिक अनियमिततेचे प्रकरण

  • या प्रकरणी जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंह शिंदे यांचे निलंबन

  • या आर्थिक अनियमिततेमुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

बीडच्या जिल्हा हिवताप विभागातील मोठी घटना समोर आली असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एरीअर्सच्या तब्बल 90 लाख रुपये अतिरिक्त उचलल्या प्रकरणी जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंह शिंदे यांचं निलंबन करण्यात आले आहे.

Beed Health Department Scam
तुमची बातमी, जी व्यवस्था बदलेल! Next Gen Repoter व्हा; न्यूज चॅनलच्या विश्वात पहिल्यांदाच साम टीव्हीची जगावेगळी संकल्पना

या कारवाईने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे वैद्यकीय एरिअर्सच्या नावाखाली विजय सिंग शिंदे यांनी 89 लाखाहून अधिक रुपयांची अतिरिक्त रक्कम उचलल्याचा गैरप्रकार नुकताच उघडकीस आला होता आणि या प्रकरणानंतर जिल्हा हिवताप विभागात खळबळ उडाली होती.

Beed Health Department Scam
Mumbai Police: सात महिन्यात १२ निलंबित,३ जण बडतर्फ, बेशिस्त मुंबई पोलिसांवर कारवाईचा बडगा; पोलीस दलात खळबळ

तर आता जिल्हा होता अधिकारी विजयसिंह शिंदे यांच्यावर आरोग्यसेवा आयुक्तालयाने थेट कार्यवाही करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे या कार्यवाहीमुळे बीड जिल्ह्याचे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडवून देणारी ठरली आहे.

Beed Health Department Scam
PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी आर्थिक अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत अधिकारी विजयसिंग विठ्ठलराव शिंदे (गट-ब) यांना तडकाफडकी निलंबित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com