तुमची बातमी, जी व्यवस्था बदलेल! Next Gen Repoter व्हा; न्यूज चॅनलच्या विश्वात पहिल्यांदाच साम टीव्हीची जगावेगळी संकल्पना

Saam TV Next Gen Reporter : तुमच्या गावातील, शाळेतील किंवा परिसरातील समस्या जगासमोर आणा! साम टीव्हीच्या Next Gen Reporter उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्थानिक समस्या रीलच्या माध्यमातून मांडण्याची संधी मिळणार आहे.
Saam TV  Next Gen Reporter :
SAAM TV NEXT GEN REPORTER: STUDENTS GET A NEW PLATFORM TO RAISE LOCAL ISSUESsaam tv
Published On

तुम्ही जागरूक, सजग विद्यार्थी आहात? तुम्हाला गावातील तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात काही सामाजिक समस्या जाणवत आहेत का? गावातील रस्ते, पाणी प्रश्न, शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता नाहीये. शाळेसाठी बसची सुविधा नाहीये, शैक्षणिक समस्या, पुस्तकांचा भार, निकृष्ट जेवण, कमी दर्जाचं शिक्षण,अशा समस्या आहेत, पण या ऐकणार कोण? या समस्यांना वाचा कोण फोडणार? आता चिंता नको, या समस्या सोडवण्यासाठी कोणचा प्रतिक्षा करण्याची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच आपल्या भागातील समस्या अख्ख्या समाजासमोर आणू शकता. आणि त्या समस्यांना वाचा फोडू शकता.

Saam TV  Next Gen Reporter :
Free Petrol: लाडक्या बहिणींना मोफत मिळणार ५ लिटर पेट्रोल; कोणी केली घोषणा?

वृत्त माध्यमांमध्ये पहिल्यांदाच साम टीव्ही एक नवा उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रम आहे, Next Gen Repoter. साम टीव्हीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला साम टीव्हीचं प्रतिनिधी होता येणार आहे. Next Gen Repoterच्या माध्यमातून तुम्ही आपल्या परिसरातील सामाजिक समस्यांना वाचा फोडू शकतात. मग त्या गावातील असो, शाळेतील असो, शाळेत जाण्यास येणाऱ्या छोट्यातल्या छोट्या समस्या तुम्ही शासनाच्या निदर्शनात आणून देऊ शकतात.

Saam TV  Next Gen Reporter :
शेतकरी कर्जमाफी योजनेतून ९४ हजार शेतकऱ्यांना वगळलं; ४६ हजार ठरले अपात्र,काय आहे कारण?

कोण बनू शकणार Next Gen Repoter?

साम टीव्हीकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या Next Gen Repoter होण्यासाठी काय करावं लागेल. कोणाला होता येईल, Next Gen Repoter.

जर तुम्ही सजग आणि जागरूक विद्यार्थी असाल तर तुम्हीही होऊ शकतात Next Gen Repoter. जे विद्यार्थी इयत्ता ८ ते ११ वी मध्ये शिकणारे असतील तर ते Next Gen Repoter होऊ शकतात.

कुठे पाठवणार तुमचा अर्ज?

Studentreporter@saamtv.Com या ईमेलवर किंवा

9594885566 या नंबरवर तुम्ही व्हॉट्स अप करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची माहिती आणि तुमच्या गावातील एक समस्या रिलच्या माध्यमातून आम्हाला पाठवावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com