

पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अशित वेदप्रकाश जाधव यांना निलंबित करण्यात आले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या स्वाक्षरीने निलंबन आदेश
बदलीसाठी आयुक्तांवर दबाव टाकल्याची चर्चा
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अशित वेदप्रकाश जाधव यांना मनपा सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या स्वाक्षरीने हा निलंबन आदेश जारी करण्यात आलाय. मात्र, या आदेशात निलंबनाचे कारण स्पष्ट न केल्याने सध्या महापालिका वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय.
महापालिकेने जारी केलेल्या अधिकृत आदेशात, दिनांक ११/०७/२०२६ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जाधव यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ११ तारखेला नेमके अशी कोणती घटना घडली, यामुळे हे निलंबन करण्यात आले याबाबत स्पष्टता आदेशात देण्यात आलेली नाही. या कारवाईबाबत महापालिकेमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार दीड महिन्यांपूर्वीच जाधव यांची पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली होती.
या बदलीवर ते नाराज होते. याच नाराजीतून ते महिनाभराच्या प्रदीर्घ रजेवर गेले होते. 1 जुलै रोजी ते पुन्हा सेवेत रुजू झाले, परंतु आपल्याला पाणीपुरवठा ऐवजी बांधकाम किंवा पथ विभागामध्येच बदली मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. ही बदली पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी थेट आयुक्तांवर राजकीय दबाव आणत असल्याचं सांगितलं जातंय.
या बदलीसाठी त्यांनी काल जाधव यांनी थेट महापालिका आयुक्तांशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधला. या संपर्क प्रक्रियेदरम्यान दोघांमध्ये तीव्र वाद झाल्याचं सांगितलंय जातंय. वेदप्रकाश जाधव यांनी आयुक्तांना पाठवलेल्या मेसेजमधील भाषा अत्यंत आक्षेपार्ह आणि चुकीची होती. आयुक्तांसोबत अशा प्रकारे हुज्जत घालणे आणि चुकीची भाषा वापरली. यामुळेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालीय.
अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार निलंबन कालावधीत जाधव यांच्यावर काही बंधने घालण्यात आली आहे. त्यानुसार जाधव यांच्याविरुद्धची खातेनिहाय चौकशीची कारवाई पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी लवकर पूर्ण करावी, असे आदेशात म्हटलंय. त्यासोबतच महापालिका आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय जाधव यांना महानगरपालिकेचे हद्दीक्षेत्र सोडता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.