महायुतीत मतभेद आहेत का? दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं! जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य

Mahayuti Seat Sharing Formula Maharashtra 2026: दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीत १७ पैकी १७ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करत जागावाटप सन्मानाने होईल असेही सांगितले.
eknath shinde
eknath shinde saam tv
Published On

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले.

eknath shinde
राज्यात 34 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; नाशिकमध्ये 5 दिवसांत IPS अधिकाऱ्याची बदली, नवी नियुक्ती कोणाची? वाचा यादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला असल्याचे सांगत, “महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास वेगाने पुढे नेत आहोत, असे शिंदे म्हणाले. एक तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असताना “आमच्या आधी मीडियालाच एवढी घाई का झाली आहे? असा सवालही त्यांनी केला.

eknath shinde
gadchiroli woman death : महाराष्ट्राचं भीषण वास्तव! वेळेत उपचार मिळाले नाहीत, महिलेनं प्राण सोडले

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता, सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मी मुख्यमंत्री असताना अजितदादा आणि देवेंद्रजींसोबत मिळून मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय, न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना आणि १० टक्के आरक्षण देण्याचे काम आम्ही केले,” असे सांगत त्यांनी सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.

eknath shinde
Reel Star Death: प्रसिद्ध महिला रिलस्टारची हॉटेलमध्ये आत्महत्या, तपासातून धक्कादायक कारण आलं समोर

उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असून मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आसाममध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सर्मा यांचे अभिनंदन केले. “एक देश, एक कायदा” ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका सुरुवातीपासूनच राहिलेली आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा एका देशात दोन कायदे असू शकत नाहीत, असे स्पष्ट केले असल्याचे सांगत, महाराष्ट्रातही या विषयावर सकारात्मक विचार केला जाईल, असे शिंदे यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांची राम मंदिर, कलम ३७० हटवणे आणि समान नागरी कायदा ही तीन स्वप्ने होती. त्यापैकी दोन स्वप्ने पूर्ण झाली असून तिसरे स्वप्नही पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आदिवासी तसेच अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या आरक्षणावर समान नागरी कायद्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करत, काहीजण समाजात दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदार संजय राऊत यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, महायुती मजबूत आहे आणि महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू असल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत. भारतीय जनता पक्ष हा देशातील नंबर एकचा पक्ष असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकाची ताकद असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, “देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची भाषा करणाऱ्यांची आज काय अवस्था झाली आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबईतील बीच कँडी क्लब येथे मेंबरशिपसाठी युरोपियन पासपोर्टची अट असल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी कठोर भूमिका घेतली.“मुंबईत असा कोणताही भेदभाव करणारा क्लब असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल,”असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीबाबत बोलताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राशी समन्वय साधणे हे मुख्यमंत्री म्हणून कर्तव्यच असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com