पश्चिम बंगालचा किंगमेकर कोण? आरक्षण, अस्मिता की हिंदुत्व? वाचा सविस्तर विश्लेषण

West Bengal election analysis : पश्चिम बंगाल निवडणुकीत हिंदुत्व, बंगाली अस्मिता आणि आरक्षण हे मुद्दे निर्णायक ठरत आहेत. मुस्लिम, मतुआ, राजबंशी आणि इतर समाजांच्या मतदानावर सत्तेची किल्ली अवलंबून असल्याचे चित्र आहे. सविस्तर विश्लेषण वाचा.
Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.
Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.saam tv
Published On

Mamata Banerjee latest news : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कधी नव्हती एवढी शांतता पाहायला मिळत आहे. लोक मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र या निवडणुकीत सर्वात जास्त प्रभाव हिंदुत्व, बंगाली अस्मिता आणि आरक्षण या प्रश्नांनी पाडला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात १५२ तर दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांवर मतदान झाले. लोकांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसादही मिळाला. मात्र पश्चिम बंगालच्या सत्तेची चावी मुस्लिम, मतुआ, राजबंशी आणि माहिष्य या समाजाच्या हाती असल्याचे चित्र आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगालमध्ये ३० टक्के मुस्लिम मतदार आहेत. हा मुस्लिम समाज एकगठ्ठा भाजपविरोधात एकवटला आहे. एवढेच नाही तर मुस्लिम बहुल ९० जागांवर तृणमूलचा विजय निश्चित मानला जातोय. या भागात मुस्लिम समाजाचे निर्णायक मतदान आहे. त्यामुळे या भागात तृणमूल काँग्रेस मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजबंशी हा समाज अनुसूचित जातीमध्ये मोडतो. पश्चिम बंगालमध्ये राजबंशी समाजाची केवळ चार टक्के इतकीच लोकसंख्या आहे. मात्र हा समाज उत्तर बंगालमध्ये ३५ ते ४० जागांवर निर्णायक भूमिका पार पाडतो.

Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.
मोठी बातमी! दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ते एआय धोरण; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतले ७ निर्णय, कुणाला होणार फायदा?

पश्चिम बंगालमध्ये तिसरा महत्त्वाचा समाज आहे तो म्हणजे मतुआ. या समाजाची लोकसंख्या जास्त नसली तरी हा समाज ३३-४० जागांवर निर्णायक भूमिका पार पाडतो. गेल्या काही वर्षांत भाजपने सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजबंशी, माहिष्य, मतुआ समाजाची बांधणी केली. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या समाजाने तृणमूल काँग्रेसला साथ दिली आहे. हा समाज फाळणीनंतर सीमावर्ती भागात स्थलांतरित झाला. मात्र NRC च्या मुद्द्यावर २०१९ मध्ये हा समाज भाजपच्या सोबत गेला. आता परिस्थिती बदलली आहे. या समाजातील काही लोकांची नावे वगळली गेल्याने हा समाज ममता बॅनर्जी यांना साथ देण्याची शक्यता आहे.

Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.
उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी डाव टाकला, पण काँग्रेस ट्विस्ट आणणार; सपकाळ थेट दिल्लीत पोहचले, उमेदवार उतरवणार का?

जंगलमहाल हा महत्त्वाचा भाग आहे. भाजपने हिंदुत्वाचे कार्ड खेळून येथील समाजाला आपल्याकडे वळवले. मात्र आता आदिवासींमध्ये समावेशासाठी महाराष्ट्रात जसा धनगर समाज आक्रमक झाला आहे, अगदी तसाच कुर्मी समाज पश्चिम बंगालमध्ये आक्रमक झाला आहे. जो पक्ष आरक्षणाला पाठिंबा देईल त्यांना हा समाज साथ देण्याची शक्यता आहे. हा समाज १५-२० जागांवर निर्णायक आहे.

तर १५ टक्के असलेल्या माहिष्य या समाजातून सुवेंदु अधिकारी येतात. त्यामुळे हा समाजही निर्णायक ठरू शकतो. त्यामुळेच मासे, झालमुरी ही अस्मितेची प्रतीके बनवली असली तरी ग्रामीण भागातील लोकांना आरक्षण, नागरिकत्व हे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यामुळे बंगालचा फैसला मुस्लिम, राजबंशी, मतुआ, कुर्मी आणि माहिष्य समाज ठरवण्याची शक्यता आहे.

Voters queue up during West Bengal Assembly elections as exit polls predict a tight contest between BJP and TMC.
Watermelon Eating: रात्री कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होते? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com