

रात्री कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होते हा दावा चुकीचा
दूषित अन्नामुळेच विषबाधा होण्याची शक्यता जास्त
पायधोनी प्रकरणामुळे अफवा वाढल्या
रात्री कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन मृत्यू होऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वीच पायधुनीमध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता कलिंगड आरोग्यासाठी घातक असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होत असल्याने भीतीचं वातावरण पसरलंय.गरमीत कलिंगड हे बरेचजण खातात.त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्याने घातक परिणाम होतात. कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो. हा मेसेज व्हायरल होतोय. आरोग्याचा आणि शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा विषय असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.
त्यामुळे कलिंगड रात्री खाणं का घातक असू शकतं? बरेच जण रात्रीही कलिंगड खातात. त्यामुळे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने तज्ज्ञांची भेट घेतली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.