कलिंगड खाल्ल्यानंतर अख्खं डोकाडिया कुटुंब संपलं; पायधुनीमधील एकाच घरातील चौघांचा मृत्यू कशामुळे झाला? कारण आलं समोर

Mumbai News: मुंबईच्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गुढ वाढले आहे. मृतांमध्ये ४० वर्षीय पती, ३५ वर्षीय पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे.
Mumbai News:
Police and forensic teams investigate after a tragic incident in Paydhoni where four family members died due to suspected food poisoning.saam tv
Published On
Summary
  • पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

  • प्राथमिक अहवालानुसार अन्न विषबाधेमुळे मृत्यू

  • कलिंगड खाल्ल्यानंतर घटना घडल्याची माहिती

कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरू करताना पोलिसांनी परिसरातील फळ विक्रेत्याची चौकशी केली होती. आता या कुटुंबाच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे.

Mumbai News:
कलिंगड खाऊन कुटुंब संपलं, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? अनुभवी शेतकऱ्याने केला मोठा दावा

मुंबईच्या पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूच्या नवी अपडेट समोर आली आहे. चार मृतदेहांच्या प्राथमिक शवविच्छेदनाचा अहवाल आला आहे. या चौघांचा मृत्यू अन्न विषबाधेमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि विषाचा प्रकार निश्चित करण्यासाठी सर्व नमुने मुंबईच्या कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत.

Mumbai News:
जेवणानंतर कलिंगड खाणं जीवावर बेतलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होईल की टरबूजामध्ये काही विषारी पदार्थ होते की मृत्यूचे कारण काही वेगळेच होतं. कुटुंबाने टरबूज कुठून खरेदी केले, याचा तपास पोलीस आणि आरोग्य विभागाकडून केला जात आहे. इतर लोकांनीही त्याच ठिकाणाहून टरबूज खरेदी केले असण्याची शक्यता आहे.

परिसरातील इतर लोकांना याचा फटका बसला आहे का, हे देखील पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी मृतदेह पुन्हा कलिना फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. दरम्यान या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. टरबूज खाल्ल्याने मृत्यू होणं ही खूप चकित करणारे आहे.

पायधोनी परिसरात राहणारे डोकाडिया कुटुंबातील सदस्यांनी रात्री १ वाजता टरबूज खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यानंतर कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४० वर्षीय पती, ३५ वर्षीय पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना २५ एप्रिलच्या रात्री घडली होती. रात्रीच्यावेळी सुमारे साडेदहा वाजता नऊ लोकांनी एकत्र जेवण केले होते.

रात्रीच्या जेवणानंतर काही नातेवाईक आपापल्या घरी परतले. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चार सदस्यांनी रात्री उशिरा १ ते १:३० वाजेच्या सुमारास टरबूज खाल्ले होते. त्यानंतर २६ एप्रिल रोजी पहाटे ५:३० ते ६ च्या दरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. सुरुवातीला त्यांच्यावर कौटुंबिक डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले.

परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यावर त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी सुमारे १०:१५ वाजता उपचारादरम्यान धाकटी मुलगी, झैनब, हिचा सर्वात आधी मृत्यू झाला. त्यानंतर रात्री सुमारे १०:३० वाजता वडील अब्दुल्ला डोकाडिया, यांचे निधन झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com