जेवणानंतर कलिंगड खाणं जीवावर बेतलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Family Of Four Dies After Eating Biryani And Watermelon In Mumbai: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कलिंगड खाताय, तर सावधान व्हा... कारण बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय... ही घटना नेमकी कुठे घडली? चुकीचे 'फूड कॉम्बिनेशन' माणसाच्या जीवावर कसं बेतू शकतं... ?
Forensic teams investigate suspected food poisoning case after a family of four died following a meal in Mumbai.
Forensic teams investigate suspected food poisoning case after a family of four died following a meal in Mumbai.saam tv
Published On

उन्हाळा सुरू झाला की आपण आवडीनं कलिंगड खातो. पण हेच कलिंगड एका कुटुंबाच्या जीवावर उठू शकतं... असा विचारही कधी कोणी केला नसेल. मुंबईच्या पायधुनी परिसरात राहणाऱ्या डोकाडीया कुटुंबानं रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ली..आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं. आणि त्यानंतर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.. डोकाडिया कुटुंबासोबत नेमकं काय घडलं? पाहूयात...

बिर्याणी, कलिंगड खाल्लं, कुटुंब संपलं !

बिर्याणी, कलिंगड खाल्ल्यानं पती-पत्नी आणि 2 मुलींचा अंत

उलट्या, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर चौघांना जेजे रुग्णालयात हलवलं

बिर्याणी खाल्यानंतर कलिंगड खाल्ल्यानं प्रकृती बिघडल्याची पोलिसांची माहिती

विषबाधेचं कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने आणि व्हिसेराची होणार फॉरेन्सिक तपासणी

दरम्यान डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या तपासणीसाठी घटनास्थळी गेलेल्या डॉक्टरने धक्कादायक माहिती दिलीय...दुसरीकडे बिर्याणी आणि कलिंगड यांचं मिश्रण डोकाडिया कुटुंबासाठी घातक ठरलं का? किंवा यातील एखादा पदार्थ आधीच खराब होता, याबाबत पोलिसांनी फॉरेन्सिक अहवाल मागवला आहे.

दरम्यान बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्यानं मृत्यू झाला असण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टरांनी फेटाळून लावलीय .डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूमागे फूड पॉयझनिंगचं कारण आहे की चुकीचा आहार एकत्र घेणं. हे तपासाअंती समोर येईलच.. मात्र बाहेरचं अन्न खाताना आणि चुकीची 'फूड कॉम्बिनेशन' करताना शंभर वेळा विचार करणं गरजेचं आहे.... कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com