Reel Star Death: प्रसिद्ध महिला रिलस्टारची हॉटेलमध्ये आत्महत्या, तपासातून धक्कादायक कारण आलं समोर

Reel Star Rohini Paradhye Death case: रिलस्टार रोहिणी पाराध्येने हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागचे धक्कादायक कारण पोलिस तपासातून समोर आले आहे.
Reel Star Death: प्रसिद्ध महिला रिलस्टारची हॉटेलमध्ये आत्महत्या, तपासातून धक्कादायक कारण आलं समोर
Reel Star Rohini Paradhye Death caseSaam Tv
Published On

प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी पाराध्ये यांची आत्महत्या

हॉटेल ग्रामपंचायतची होती मालकीण

हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेऊन संपवलं आयुष्य

कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आली समोर

भरत नागणे, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालु्क्यातील प्रसिद्ध रिलस्टार आणि हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीण रोहिणी पाराध्ये यांच्या मृत्यूमुळे सर्वांना मोठा धक्का बसला. २५ वर्षांच्या रोहिणी पाराध्ये यांचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आला होता. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहिणी यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. मंगळवारी हॉटेलम ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

रिलस्टार रोहिणी पाराध्ये यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांनी प्रेम विवाह केला होता. काही काळ ते पुणे येथे राहत होते. तिथेच त्यांनी रिल करायला सुरुवात केली होती. मंगळवेढा तालुक्यात ब्रम्हपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायतीच्या त्या मालकीन होत्या. रोहिणी निलेश पाराध्ये यांनी मंगळवारी हॉटेलच्या स्वयंपाकघरातील लोखंडी अँग्लला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रिलस्टार विवाहित रोहिणी यांच्या आत्महत्येने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात कारणावरून आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या घटनेनंतर रोहिणी यांचा नवरा निलेश पराध्ये यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी आस्कमीत मृत्यू अशी नोंद केली असली तरी त्यांच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे. गेल्या काही वर्षभरापासून रोहिणी पाराध्ये आणि निलेश पाराध्ये हे नवरा-बायको विविध सामाजिक घटना आणि खाद्यपदार्थावर आधारीत रिलच्या माध्यमातून सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्यांनी रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर खवैय्यासाठी ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत हा व्यवसाय सुरू केला.

Reel Star Death: प्रसिद्ध महिला रिलस्टारची हॉटेलमध्ये आत्महत्या, तपासातून धक्कादायक कारण आलं समोर
Marathi Reel star Death: माय-लेकाची सुंदर जोडी तुटली...; मराठमोळ्या रिल स्टारचं अचानक निधन, चाहत्यांना मोठा धक्का

हॉटेल व्यवसायात ते स्थिर होऊन आणखी नवीन शाखा सुरू करत असताना अचानक पत्नी रोहिणी पाराध्ये यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस सध्या त्यांच्या आत्महत्येमागचे खरे कारण शोधत आहेत. तरी देखील हॉटेल व्यवसायाच्या शाखा वाढल्या. यातून आलेल्या तणावामुळे आणि वादामुळे रोहिणीयांनी रागाच्या भरात आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

Reel Star Death: प्रसिद्ध महिला रिलस्टारची हॉटेलमध्ये आत्महत्या, तपासातून धक्कादायक कारण आलं समोर
Reel Star Death: प्रसिद्ध मराठमोळ्या रिलस्टारचं निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com