बकरी ईदनिमित्त दुर्गाडीवर तणाव; नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स तोडले| Video

Durgadi Fort After Protest Over Namaz : बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडल्याने तणाव निर्माण झाला आहे.

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातील धार्मिक वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत आलाय. बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाईचे आदेश जिल्हा प्रशासनानं जारी केलेत. गुरुवारी सकाळीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरतीसुद्धा केली. यावेळी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर, तर पायथ्याशी ईदगाह आहे. ही हिंदू, मुस्लिम धर्मांची धार्मिक स्थळं आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून हिंदू आणि मुस्लीम समाजात वाद सुरूय. हिंदू संघटनांचा दावा आहे की, इथे मूळ दुर्गा देवीचं मंदिर आहे. तर मुस्लीम समाजबांधव ईदगाह असल्याचा दावा करत असून हा वाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र शिवसेना गेल्या५० वर्षांपासून याच कारणास्तव आंदोलन करतेय. गेले काही वर्ष दोन्ही शिवसेना इथे आंदोलन करताना दिसून येत आहेत, तर यावर्षी भाजप देखील या आंदोलनात सहभागी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com