Maharashtra Weather : घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’; उर्वरित महाराष्ट्रात श्रावणातील रिमझिम सरी अन् ऊन-सावल्यांचा खेळ

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोकणातील घाटमाथ्यांसह रायगड-रत्नागिरी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather UpdateSaam TV Marathi
Published On

Maharashtra heavy rain yellow alert latest weather update : २ दिवसांत श्रावण महिन्याची सुरुवात होईल, त्याआधी राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. एकीकडे श्रावणी सरींची रिमझिम सुरु असतानाच हवामान विभागाने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी या किनारपट्टीच्या भागांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागात हवामान खात्याकडून सतर्कतेचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, राज्याच्या उर्वरित भागात मात्र ढगाळ हवामानासह हलक्या सरींची हजेरी आणि उघडीप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

घाटांमध्ये मुसळधार, तर मैदानी भागात उघडीप

श्रावण महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवला जातोय. सध्या घाटमाथ्यावरील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या परस्परविरोधी प्रवाहामुळे मध्य भारतात हवेचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. याचा प्रामुख्याने परिणाम सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर दिसून येत आहे. घाट परिसरात वाऱ्याचा वेग आणि ढगांची घनता वाढल्याने पुणे, सातारा आणि कोकणातील घाटांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळू शकतो.

Maharashtra Weather Update
Palghar Earthquake: मध्यरात्री पालघर भूकंपाने हादरले! तासाभरात भूकंपाचे दोन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

श्रावणसरी अन् ऊन- सावल्यांची साथ

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र सध्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. या भागात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मधूनच पडणारे कोवळे ऊन अन् अचानक येणाऱ्या श्रावणसरी असा संमिश्र अनुभव नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर, मराठवाडा व पूर्व विदर्भात दिवसाच्या तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा जाणवत आहे.

Maharashtra Weather Update
Family Law Verdict: सावत्र वडिलांकडून पोटगी मागता येते का? कोर्टाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांना दिलासा अन् सल्ला

श्रावणातील या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा फायदा पिकांना होत असून, जिथे अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते तिथल्या शेतीकामांना आता वेग आला आहे. ज्या भागात पावसाने उघडीप दिली आहे, तिथे कोळपणी आणि तणनाशक फवारणीची कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com