Palghar Earthquake: मध्यरात्री पालघर भूकंपाने हादरले! तासाभरात भूकंपाचे दोन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Palghar Maharashtra earthquake : पालघर जिल्ह्यातील जव्हार-विक्रमगड तालुक्यात रात्री एका तासाच्या अंतरात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिल्या धक्क्याची तीव्रता 3.2 तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल नोंदवली गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Jawhar Vikramgad earthquake latest news
Jawhar Vikramgad earthquake latest news Saam TV Marathi
Published On

फय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

Jawhar Vikramgad earthquake latest news : पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि विक्रमगड तालुका परिसरात रात्रीच्या वेळी भूकंपाचे सलग दोन सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. अवघ्या एका तासाच्या अंतराने हे दोन्ही धक्के जाणवल्याची नोंद कऱण्यात आली आहे. पहिला धक्का ३.२ तर दुसरा धक्का ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा नोंदवला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास २ तालुक्यात अचानक जमीन हादरल्याचा आणि गूढ आवाज आल्याचा अनुभव स्थानिकांना आला. भूकंपाची तीव्रता सौम्य असली तरी एकापाठोपाठ एक अशा दोन हादऱ्यांमुळे भयभीत झालेले नागरिक घराबाहेर पडले.

Jawhar Vikramgad earthquake latest news
Family Law Verdict: सावत्र वडिलांकडून पोटगी मागता येते का? कोर्टाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय

काही दिवसांपूर्वीच जव्हार तालुक्यात अशाच प्रकारे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या घटनेची भीती ताजी असतानाच आता पुन्हा एकदा दोन धक्के बसल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jawhar Vikramgad earthquake latest news
Cyclone : मोठी बातमी! 'या' दोन चक्रीवादळांमुळे मान्सूनची चाल बिघडणार? हवामान खात्याचा मोठा इशारा

या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा मोठी वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही; मात्र प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. वारंवार होणाऱ्या या भूकंपाच्या हालचालींमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे सावट असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com