Weather Update : मान्सून महाराष्ट्रात दाखल; पुणे, साताऱ्यासह २५ जिल्ह्यांना IMD चा 'यलो अलर्ट', मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : अखेर मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले असून आयएमडीने पुणे, सातारा, रायगड, नाशिकसह २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता.
Rain Alert: विदर्भ- मराठवाड्यासाठी ७२ तास महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update Saam TV
Published On

monsoon arrives in Maharashtra latest update : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनचे महाराष्ट्रात अधिकृतरीत्या आगमन झाले आहे. तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या आगमनासोबतच भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील हवामान अंदाज जाहीर केला. २५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, राज्याच्या उर्वरित भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Rain Alert: विदर्भ- मराठवाड्यासाठी ७२ तास महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
LPG price Hike : महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरातील ताजे दर काय?

२५ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

खबरदारीचा उपाय म्हणून हवामान विभागाने राज्यातील एकूण २५ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे.

जोरदार पावसाचा इशारा. (येलो अलर्ट)

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.

रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली.

उन्हाचा चटका कायम असलेली ठिकाणे : ब्रह्मपुरी ४२.९, मालेगाव ४२.२, अकोला ४२, वर्धा ४२

Rain Alert: विदर्भ- मराठवाड्यासाठी ७२ तास महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी विजा पडण्याच्या घटना घडतात, त्यामुळे नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मान्सूनच्या या सक्रियतेमुळे आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Rain Alert: विदर्भ- मराठवाड्यासाठी ७२ तास महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com