Maharashtra weather : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी कोसळणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

Maharashtra Rain Forecast: महाराष्ट्रात सध्या मान्सूनला ब्रेक लागला असून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचा आयएमडीचा अंदाज आहे. २५ जुलैनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Maharashtra Rain Forecast
Maharashtra Rain ForecastSaam tv marathi
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

When will heavy rain return to Maharashtra : मागील आठवड्यात राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पण त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळत आहे, पण बहुतांश भागात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उकडा वाढलाय. त्यामुळे राज्यात पाऊस कधी कोसळणार? याकडे शेतकऱ्यांसह राज्यातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत. हवामान विभागाकडून राज्यात पाऊस कधी कोसळणार? याची तारीख सांगण्यात आली आहे. पुण्यातील आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ एस डी सानप यांनी साम टीव्हीसोबत बोलताना राज्यातील पावसाचे अपडेट्स दिले आहेत.

राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊसाची प्रतीक्षा आहे. जुलै महिना अर्धा संपला राज्यात अनेक अनेक भागात पाऊस नाही. राज्यात पुढील ५ दिवस तरी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची तूट आहे. मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यात पावासने हजेरी लावलीच नाही. लातूर,बीड,सोलापूर,यवतमाळ,परभणीमध्ये पावसाची आकडेवारी मायनसमध्ये असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra Rain Forecast
Black & White : उद्धव ठाकरे, ऑपरेशन टायगर ते मराठी माणूस; १० प्रश्नांवर सचिन अहिरांची रोखठोक उत्तरे, Exclusive मुलाखत

येणाऱ्या पाच दिवसांमध्येही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमीच आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीचा पडलेला पाऊस मुंबई कोकण पुण्यासह घाटमाथ्यावर पडला आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. राज्यामध्ये जर आपण बघितलं तर १ जुलै ते ८ जुलै दरम्यान मान्सून सक्रिय राहिला होता. त्या कालावधीत बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात पावसाची शक्यता आहे. २५ जुलैनंतर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पावसाचा ब्रेक -

८ जुलै नंतर राज्यामध्ये पावसाचा खंड पडलेला आहे, ज्याला आपण 'Break in Monsoon' म्हणतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जर आपण बघितलं तर कोकण किंवा घाट माथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय, पण उर्वरित महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आकाश निरभ्र आहे आणि पाऊस कमी झालेला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची तूट आहे. जसं की बीडमध्ये उणे ३९% (-39%), जालन्यामध्ये उणे ३५% (-35%) आणि धाराशिवमध्ये उणे ३०% (-30%) अशी पावसाची तूट अजूनही कायम आहे.

Maharashtra Rain Forecast
भय इथले संपेना! बीडमध्ये २४ तासांत २ हत्या; बसस्थानकाजवळ आढळला शिक्षकाचा मृतदेह तर आंबेजोगाईत तरुणाला संपवलं

पुढील ५ दिवसांचा अंदाज

पुढील ५ दिवसांचा विचार केला तर मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी सध्या तरी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे पुढील ५ दिवसांत राज्यात कुठेही मुसळधार किंवा मोठ्या पावसाची शक्यता फार कमी आहे. विदर्भामध्ये मात्र १५ जुलै ते १८ जुलै दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची (Thunderstorm) शक्यता आहे, त्यासाठी तिथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. पण हा पाऊस देखील स्थानिक स्वरूपाचा असेल, सातत्यपूर्ण मुसळधार पाऊस नसेल.

Maharashtra Rain Forecast
भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com