भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

Jamkhed wedding attack : अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात विवाह सोहळ्यात नाव पुकारले नाही म्हणून तलाठ्याने सूत्रसंचालकावर लोखंडी माईकने हल्ला केल्याचा आरोप कऱण्यात आला.
Jamkhed wedding attack
Jamkhed wedding attackSaam TV
Published On

सुशील थोरात , अहिल्यानगर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाहसोहळ्याला गालबोट लागले. स्वागतावेळी आपले नाव माईकवरून पुकारले नाही, या क्षुल्लक कारणावरून एका तलाठ्याने संतापाच्या भरात माईक हातातून हिसकावून तोच लोखंडी माईक एका तरुणाच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझं नाव माईकवर का पुकारलं नाही?; लोखंडी रॉड असलेला माईक घातला डोक्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा (ता. जामखेड) येथील अशोक रामचंद्र पठाडे (वय ३७) हे राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात सूत्रसंचालन करत होते. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक आणि मान्यवरांचे ते माईकवरून स्वागत करत असताना तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांनी त्यांच्याकडे येत माझं नाव माईकवर का पुकारलं नाही? असा जाब विचारला.

Jamkhed wedding attack
kolhapur : बारशाची तयारी सुरू असतानाच घरातून उठली अंत्ययात्रा, अवघ्या महिनाभराच्या चिमुकलीच्या आईचा संशयास्पद मृत्यू

या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. आरोपानुसार, संतापलेल्या हजारे यांनी पठाडे यांना शिवीगाळ करत तोंडावर मारहाण केली. त्यानंतर हातातील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून तो त्यांच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात पठाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता तुला खल्लास करतो अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

Jamkhed wedding attack
Wife Death : पीएसआयच्या पत्नीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ

याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

घटनेनंतर विवाहसोहळ्यात एकच गोंधळ उडाला. उपस्थित जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार आणि प्रशांत भाऊसाहेब पवार यांनी तत्काळ धाव घेत भांडण सोडवले आणि जखमी पठाडे यांची सुटका केली. त्यानंतर प्रशांत मारुती शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे दाखल केले.

Jamkhed wedding attack
मुंबईकरांचा जीव टांगणीला! AC लोकलचा कुलिंग सिस्टीम फेल; गुदमरल्याने ३ प्रवासी अत्यवस्थ, १ रुग्णालयात दाखल

या प्रकरणी जखमी अशोक रामचंद्र पठाडे यांच्या फिर्यादीवरून तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com