Wife Death : पीएसआयच्या पत्नीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ

Hyderabad ACP wife death : हैदराबादमधील एसीपी चंद्रशेखर यांच्या पत्नी हेमलता यांचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू. अलवाल परिसरातील या घटनेनंतर पोलिसांनी आत्महत्या आणि घातपात या दोन्ही शक्यतांचा तपास सुरू केला आहे.
Crime
CrimeSaam tv
Published On

Hyderabad ACP wife found dead at home : हैदराबाद जवळील एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात, यादृष्टीने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

तेलंगणातील मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील अलवाल परिसरात रविवारी संध्याकाळी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी हेमलता वृंदावन राहत्या घरी मृतावस्थेत आढळली, अशी माहिती पोलिसांनी दिली. हेमलता या हैदराबादच्या चारमिनार परिसरात सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रशेखर यांच्या पत्नी होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमलता वृंदावन कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरात छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.

Crime
Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

या घटनेची पुष्टी करताना अलवाल पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले, "ही घटना काल संध्याकाळी घडली. मृत महिलेची ओळख हेमलता अशी पटली आहे. ती तिच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृत आढळली. तिचा पती, चंद्रशेखर, हैदराबादमधील चारमिनार येथे एसीपी म्हणून कार्यरत आहे."

माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात हलवण्यात आला. मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Crime
Deputy Collector : २ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई; महसूल विभागात मोठी खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com