भय इथले संपेना! बीडमध्ये २४ तासांत २ हत्या; बसस्थानकाजवळ आढळला शिक्षकाचा मृतदेह तर आंबेजोगाईत तरुणाला संपवलं

Beed Crime News : बीड जिल्ह्यात २४ तासांत दोन धक्कादायक घटना घडल्या. जुन्या वादातून एका तरुणाची हत्या, तर आंबेजोगाई बसस्थानकाजवळ शिक्षकाचा संशयास्पद मृतदेह आढळला. दोन्ही प्रकरणांचा पोलीस कसून तपास करण्यात येत आहे.
Beed News
Beed NewsSaam TV Marathi
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Beed Crime News : बीड जिल्ह्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासांत आंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन धक्कादायक घटना समोर आल्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर दुसरीकडे आंबेजोगाई बसस्थानकाजवळ एका शिक्षकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. नातेवाईकांनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

घाटनांदुर येथील ज्ञानेश्वर वाकडे या तरुणाची जुन्या वादातून काही जणांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या वाकडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सकाळी ८ वाजल्यापासून आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत आरोपींवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी ७ आरोपींवर गुन्हे दाखल केल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

या प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित २ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Beed News
भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

आंबेजोगाई बसस्थानकाजवळ शिक्षकाचा मृतदेह

ज्ञानेश्वर वाकडे खून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, आंबेजोगाई बसस्थानकासमोर एका शिक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृत शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला आहे. एकाच दिवसात दोन गंभीर घटना घडल्यामुळे आंबेजोगाई परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Beed News
Wife Death : पीएसआयच्या पत्नीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ

गुन्हेगारांवर वचक कधी बसणार?

२४ तासांच्या आत एका तरुणाची हत्या आणि एका शिक्षकाचा संशयास्पद मृतदेह मिळणे, यावरून बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे दिसून येते. मारेकऱ्यांना पोलिसांचा अजिबात धाक राहिला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Beed News
kolhapur : बारशाची तयारी सुरू असतानाच घरातून उठली अंत्ययात्रा, अवघ्या महिनाभराच्या चिमुकलीच्या आईचा संशयास्पद मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com