राज्यात गेल्या 24 तासांत अचानक हवामान बदलले असून विदर्भ, खांदेश आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये झालेली भीषण गारपीट आणि यवतमाळच्या बाजार समितीत भिजलेला हजारो क्विंटल गहू यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वाढत्या उकड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेला पावसाचा अंदाज विदर्भात खरा ठरला असून यवतमाळच्या अरणी कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू असतानाच अचानक पाऊस आल्याने उघड्यावर असलेला सुमारे 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजला. यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. मात्र बाजार समितीत प्रशासनाने भिजलेल्या मालाचा योग्य तणाव निवळला. गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, ज्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरातील धडगाव तालुक्यातील काकडलदा, खामला या भागांत भीषण गारपीट झाली. या पावसामुळे सातपुड्यातील प्रसिद्ध गावरान आंब्याचा हंगाम धोक्यात आला असून 'आमचुल' उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात गारांसह झालेल्या पावसामुळे भात पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या पिकावर आजच्या पावसाने पुन्हा घाला घातला आहे. वाशिमच्या रिसोड परिसरात भाजीपाला पिकांचे नुकसाने होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात रामनगर साखर कारखाना परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून 40 अंशांच्या पार गेलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या जलन्यातील नागरिकांना या पावसामुळे उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.