Siddhi Hande
शेतकरी नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बच्चू कडू यांचे पूर्ण नाव ओमप्रकाश बाबाराव कडू असे आहेत. त्यांना बच्चू कडू या नावाने ओळखले जाते.
बच्चू कडू महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावचे रहिवासी आहे. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झााला.
बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी राजकारणात प्रवेश केला.
बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून केली. त्यांनी सुरुवातीला शिवसेनेत प्रवेश केला होता.
१९९९ मध्ये बच्चू कडू यांनी स्वतः चा प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन केला. विदर्भात या पक्षाने आपले वर्चस्व निर्माण केले.
२००४ मध्ये बच्चू कडू यांनी पहिल्यांदा अचलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांची आमदार म्हणून निवड झाले.
बच्चू कडू यांनी सलग चार वेळा विधानसभेत काम केले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
बच्चू कडू हे आज शिदेंसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार असल्याचे समजत आहे.