प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण कार अपघात झाला.
हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांचे निधन झाले.
अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते संतोष नायर (Santhosh Nair) यांचे एका रस्ते अपघातानंतर निधन झाले. ही घटना पतनमथिट्टा जिल्ह्यातील एनाथू येथे घडली. ते ज्या कारमधून प्रवास करत होते, त्या कारची एका लॉरीला धडक झाली, ज्यामुळे मोठा अपघात घडला. या अपघातात त्यांची पत्नी (शुभाश्री) या जखमी झाल्या. अभिनेत्याने वयाच्या 65 वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्याच्या अपघाती निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी आणि कलाकारांनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेते संतोष नायर हे साऊथ इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांचे निधन झाले. लॉरी चालकालाही या अपघातात दुखापत झाली आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अभिनेते संतोष नायर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९८२ मध्ये झाली. १९८२ मधील 'इथू नंगळुडे कथा' (Ithu Njangalude Katha) या चित्रपटाद्वारे संतोष नायर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यामध्ये त्यांनी खलनायक, मुख्य भूमिका, सहाय्यक पात्रे आणि विनोदी भूमिका अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. 'मोहिनीअट्टम' हा त्यांची शेवटचा चित्रपट ठरला.
संतोष नायर यांचा जन्म १९६० मध्ये तिरुवनंतपुरम येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण 'सेंट जोसेफ्स हायर सेकंडरी स्कूल'मधून पूर्ण केले.त्यानंतर अभिनेत्याने 'महात्मा गांधी कॉलेज'मध्ये गणितामध्ये उच्च शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात ते राजकारणातही सक्रियपणे सहभागी होते. त्यानंतर त्यांनी अभिनयाची वाट पकडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.