Abhang Tukaram: हा मराठी अभिनेता झळकणार खलनायक अवतारात; 'अभंग तुकाराम'मध्ये साकारणार खास भूमिका

Abhang Tukaram Marathi Movie: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘अभंग तुकाराम’ हा ऐतिहासिक-आध्यात्मिक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय पूरकर खास भूमिकेत झळकणार आहेत.
Abhang Tukaram Marathi Movie
Abhang Tukaram Marathi MovieSaam Tv
Published On

Abhang Tukaram: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकप्रिय अभिनेते अजय पूरकर आता एका नव्या आणि अनोख्या भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात ते संत तुकारामांचे विरोधक ‘मंबाजी’ या खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सकारात्मक भूमिकांमधून ओळखले जाणारे अजय पूरकर या वेळी पूर्णपणे नकारात्मक व्यक्तिरेखा साकारत आहेत. ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी भक्तीभाव, संघर्ष आणि नाट्यमयतेचा संगम ठरणार आहे.

अभंग तुकाराम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. तर कथा आणि संवाद सुप्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाचे सादरकर्ते पॅनोरमा स्टुडिओज असून निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक, तसेच सहनिर्माते मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी आहेत. संत तुकारामांच्या जीवनावर आधारित असलेल्या या कथेत भक्ती आणि विरोध यांचा संघर्ष प्रभावीपणे उलगडला आहे.

Abhang Tukaram Marathi Movie
Sameer Wankhede On SRK: मी सामान्य माणूस! SRK सोबतच्या वादावर समीर वानखडेंची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले?

चित्रपटातील ‘मंबाजी’ हे पात्र संत तुकोबांचा छळ करणारे, त्यांच्या भक्तीचा विरोध करणारे आणि त्यांच्या कीर्तीला कमी लेखणारे दाखवले गेले आहे. बहिणाबाईंनी मंबाजीचे वर्णन “विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी” असे केले आहे. ज्यातून या व्यक्तिरेखेचा क्रूरपणा स्पष्ट होतो. अजय पूरकर यांच्या अभिनयातून या भूमिकेला जिवंतपणा मिळणार आहे.

Abhang Tukaram Marathi Movie
२ चित्रपटातून एक्झिट, प्रभाससोबतचा मुव्ही का सोडला? दिपिकानं वादावर सोडलं मौन, बॉलिवूडची मस्तानी नेमकं काय म्हणाली?

आपल्या या नव्या भूमिकेबद्दल बोलताना अजय पूरकर म्हणाले, “आजवरच्या माझ्या भूमिका बहुतांश सकारात्मक होत्या. पण ‘मंबाजी’ ही भूमिका माझ्यासाठी पूर्णपणे वेगळी आणि आव्हानात्मक आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन मी या व्यक्तिरेखेतून काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही भूमिका ताकदीची आहे आणि कलाकार म्हणून ती मला खूप महत्त्वाची वाटते. दिग्पाल लांजेकर सरांसोबत काम करताना नेहमीच काहीतरी शिकायला मिळतं.”

या चित्रपटाची तांत्रिक बाजूही तितकीच सक्षम आहे. छायांकन संदीप शिंदे, संकलन सागर शिंदे आणि विनय शिंदे यांनी केलं आहे. रंगभूषा अतुल मस्के, वेशभूषा सौरभ कांबळे, संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीत मयूर राऊत यांनी सांभाळलं आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी केलं असून, साहसदृश्ये बब्बू खन्ना, नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे, कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज आणि संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांनी केली आहे. ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट संत तुकोबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास, भक्तीचा मार्ग आणि समाजातील मत्सर व अंधश्रद्धेविरोधातील संघर्ष यांचं प्रभावी चित्रण करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com