Satish Shah Last Post : तुम्ही नेहमी...; विनोदी अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल

Satish Shah Last Post viral : विनोदी अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल झालं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेते शम्मी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता.
Satish Shah Last Post
Satish Shah Last Post viralSaam tv
Published On
Summary

ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार सतीश शाह यांचं निधन

निधनाच्या काही दिवस आधी त्यांनी शम्मी कपूर यांच्यासाठी केली होती खास पोस्ट

चाहत्यांनी आणि बॉलिवूड कलाकारांकडून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते सीतश शाह यांच्या निधनाने चाहते आणि सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. सतीश शाह यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून किडनीशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. सर्वांना खदखदून हसवणाऱ्या सतीश शाह यांची मृत्यूआधीची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सतीश शाह यांच्या मृत्यूनंतर आता त्यांची शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. सतीश शाह यांनी ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांच्या जन्मदिनी पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. २१ ऑक्टोबर रोजी शम्मी कपूर यांचा जन्मदिन होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी जुना फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. या फोटोमध्ये त्यांच्यासहित गोविंदा आणि शम्मी कपूर होते.

अभिनेते सतीश शाह यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की, शम्मी कपूर यांना जन्मदिनी शुभेच्छा. तुम्ही नेहमी आमच्या आसपास असता'. त्यांनी लिहिलेली ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.

सतीश शाह यांनी शेअर केलेला फोटो हा २००६ सालचा आहे. 'सँडविच' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कलाकारांनी हा फोटो काढला होता. या सिनेमात सतीश शाह यांनी चेलारमणीची भूमिका साकारली होती. तर शम्मी यांनी स्वामी त्रिलोकनंद यांची भूमिका साकारली होती.

अभिनेते सतीश शाह यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली होती. सतीश शाह यांची विनोदबुद्धी अप्रतिम होती. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या टीव्ही शोमुळे ते घराघरात पोहोचले. त्यांनी या शोमध्ये इंद्रवर्धन साराभाईची भूमिका साकारली होती. कौटुंबिक नाटकाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षक आणि चाहत्यांच्या हृदयात खास स्थान मिळवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com