अभिनय बेर्डेचा अलिकडेच 'उत्तर' चित्रपट रिलीज झाला आहे.
अभिनय बेर्डेने आजवर अनेक चित्रपटात आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
अभिनय बेर्डे हा ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे.
मराठी अभिनेता अभिनय बेर्डे सध्या त्याचा चित्रपट 'उत्तर' मुळे चांगलाच चर्चेत आहे. 'उत्तर' चित्रपट सोशल मीडियावर तुफान गाजत आहेत. 'उत्तर' मधून आई-मुलाची अनोखी गोष्ट दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डेसोबत रेणुका शहाणे आणि हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहेत. अभिनय बेर्डे हा ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे. अभिनय बेर्डेने नुकतीच सकाळ प्रीमियरला मुलाखत दिली. यात त्याने वडिलांबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या.
मुलाखतीत अभिनय बेर्डे म्हणाला की, "नाटक करताना मला अस नेहमी वाटते की, त्यांचा सल्ला आणि त्यांची शिकवण खूप गरजेची आहे. कारण त्यांचा Business Mind सगळ्याच बाबतीत जबरदस्त होता. अशोक मामा त्यांना 'पक्का वाणी' आहेस असे म्हणायचे. नाटक आणि इंडस्ट्रीला घेऊन त्यांचा Business Mind चांगला होता. जे मला त्यांच्याकडून शिकून घ्यायच राहून गेलं..."
पुढे अभिनय म्हणाला की, "मला वाटत की तो नॅचरली DNA तुमच्यात येतो, तर तो मी विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. मला त्यांच्यासारखा हुशार बिझनेस मॅन व्हायला नक्कीच आवडेल. आई-बाबा दोघांचा प्रामाणिकपणा, दोघांची शिस्त, दोघांचं कामावरचं प्रेम हे माझ्यात आहे. या गोष्टी मला त्या दोघांकडून मिळाल्या..."
'उत्तर' चित्रपट 12 डिसेंबर 2025 ला रिलीज झाला. अभिनय बेर्डेने आजवर अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. अलिकडेच तो 'दशावतार' सारख्या मोठ्या चित्रपटात झळकला. त्याने 'रंपाट', 'मन कस्तुरी रे', 'सिंगल', 'बॉईज 4', 'वडापाव' यांसारखे अनेक चित्रपटात काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.