Renuka Shahane : "मला धाकट्या बहिणीसारखं वागवायचा..."; रेणुका शहाणेंनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण

Renuka Shahane-Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेणुका शहाणेंनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव सांगितला.
Renuka Shahane-Laxmikant Berde
Renuka ShahaneSAAM TV
Published On
Summary

रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा नवीन मराठी चित्रपट येत आहे.

रेणुका शहाणे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव सांगितला.

रेणुका शहाणे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

मराठी, हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) लवकरच एका नवीन मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी खूपच उत्सुक आहेत. रेणुका शहाणे यांनी नुकत्याच सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव सांगितला आहेत. तसेच रेणुका शहाणे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा मुलगा अभिनय बेर्डे सोबत काम केले आहे. त्यांनी बेर्डे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीसोबत काम केले आहे. त्यांचा अनुभव कसा होता, जाणून घेऊयात.

रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा 'उत्तर' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयच्या माध्यमातून रेणुका शहाणे यांनी बेर्डे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीसोबत काम केले आहे. अभिनयसोबत काम करतानाचा अनुभव सांगताना रेणुका शहाणे म्हणाल्या, "'उत्तर' मध्ये अभिनय काम करतोय हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता..."

मुलाखतीत पुढे रेणुका शहाणे अभिनय बेर्डे यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव सांगत म्हणाल्या की, " माझ्या मराठी चित्रपटाची सुरुवात मी लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर केली. आधी मी त्याची हिरोईन होते. मग 'हम आपके हैं कौन' मध्ये भाभी झाले. आमच नात सुंदर होत. तो मला धाकट्या बहिणी सारखं वागवायचा. त्यांनी मला 'हम आपके'च्या सेटवर खूप सांभाळले."

बेर्डे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीसोबत काम करण्याबाबत रेणुका शहाणे म्हणाल्या, "मी अभिनयसोबत काम करते, म्हणजे मी यांच्या तिसऱ्या पिढीसोबत काम करते. मी प्रियाच्या आईबरोबर काम केले होते. मी लहान होते तेव्हा गजरा, मिश्किली असे कार्यक्रम असायचे. विनय दादा आपटे यांनी दिग्दर्शित केलेल्या मिश्किली नावाच्या एका कार्यक्रमात मला काम करायची संधी मिळाली. त्यात प्रियाच्या आई लता अरुण होत्या. त्या खूप गोड स्वभावाच्या होत्या. सर्वांना सेटवर सांभाळायच्या. सगळ्यांसाठी खाऊ आणायच्या."

Renuka Shahane-Laxmikant Berde
Govinda Health Update : गोविंदा अचानक बेशुद्ध कसा झाला? डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यानं सांगितलं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com