Devmanus : देवमाणूसच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे...

Devmanus Marathi Movie : देवमाणूस या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच झळकणार मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी
mahesh manjrekar and renuka shahane
mahesh manjrekar and renuka shahane
Published On

Devmanus Marathi Movie : आगामी वर्ष हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृतीसाठी महत्वपूर्ण असणार आहे. अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट २०२५ साली प्रदर्शित होणार आहेत. यामधील आगामी देवमानून या मराठी चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात प्रतिष्ठित कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे, त्यांच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमच एकत्र येणार आहेत.

नटसम्राट आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांसारख्या चित्रपटांतील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा चांगलाच उमटवला आहे. इंटेन्स ड्रामा ने भरपूर अशा भूमिकांपासून ते पावरफुल ॲक्शन-पॅक व्यक्तिरेखा साकारत महेशजींनी मनोरंज विश्वात सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक अशी आपली जागा बनवली आहे. दुसरीकडे अभिनेत्री रेणुका शहाणे, हम आपके है कौन, अबोली, जानिवा यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभूतपूर्व भूमिकांमुळे प्रसिद्ध आहेत, त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकाची शोभा वाढवली आहे. टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात दमदार कारकीर्दीसह, त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

अभिनेते महेश मांजरेकर यांनी या सिनेमा बद्दल आपले मत व्यक्त करताना सांगितले, “देवमाणूस सारख्या चित्रपटामध्ये रेणुकासोबत काम करणे हा माझ्यासाठी एक खूप बहुप्रतिक्षित सर्जनशील प्रवास वाटतो. मी सध्या या नव्या ऑन-स्क्रीन भागीदारीबद्दल खूप जास्त उत्साहित आहे आणि आशा करतो की आपले प्रेक्षक सुद्धा आमच्या या नव्या जोडीसाठी असाच उत्साह दाखवतील."

mahesh manjrekar and renuka shahane
Pushpa 2 : काय सांगता, पुष्पा - २ मध्ये क्रिकेटर कृणाल पंड्या, फोटो बघून तुम्हालाही तसंच वाटलं ना!

तसेच, अभिनेत्री रेणुका शहाणे या म्हणाल्या, "देवमाणूसच्या निमित्ताने मी महेश सोबत जरी पहिल्यांदा काम करत असले तरी आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय, त्यामुळे असं वाटलंच नाही की आम्ही यापूर्वी एकत्र काम केल नाहीये. मला खात्री आहे 'देवमाणूस' बघून प्रेक्षकांना काहीतरी दमदार बघितल्याचं समाधान मिळेल. खूप वर्षांनी मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळालीये, त्याचा विशेष आनंद होतोय."

mahesh manjrekar and renuka shahane
sunil pal and mushtaq khan kidnapping : अभिनेते मुश्ताक खान आणि सुनील पालच्या अपहरण प्रकरणात नवा खुलासा...

तेजस प्रभा विजय देवस्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यांनी माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट, रकुल प्रीत सिंग सोबत छत्रीवाली यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. "देवमाणूस" सिनेमात दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत जे प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन अनुभव असणार आहे. दोन्ही कलाकारांचे जबरदस्त अभिनय कौशल्य प्रदर्शित करण्याचे वचन हा आगामी मराठी चित्रपट देणार आहे. या अभिनेत्यांचे चाहते एका अविस्मरणीय अनुभवाची वाट पाहू शकतात, जिथे महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हे मुख्य आकर्षण असेल त्यामुळे नक्कीच हा चित्रपट एक जबरदस्त मेजवानी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com