Govinda Health Update : गोविंदा अचानक बेशुद्ध कसा झाला? डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यानं सांगितलं कारण

Govinda Discharged : बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Govinda Discharged
Govinda Health UpdateSAAM TV
Published On
Summary

बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची प्रकृती अचानक बिघडली.

गोविंदा यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गोविंदा यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे. मंगळवारी (11 नोव्हेंबर) रात्री ८ वाजता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला औषधे देण्यात आली आणि पहाटे 1 च्या सुमारास त्यांना मुंबईतील जुहू परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदा अचानक बेशुद्ध पडल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

61 वर्षीय अभिनेता गोविंदा यांना बुधवारी मुंबईतील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता मात्र गोविंदा यांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर गोविंदा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मी आता ठीक आहे. मी खूप थकलो होतो कारण मी खूप व्यायाम केला होता. योग आणि प्राणायाम आरोग्यासाठी सर्वोत्तम आहेत. जास्त व्यायाम शरीरावर ताण आणू शकतो. कठीण व्यायामापेक्षा योग करणे चांगले. मी स्वतःला आणखी हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी मला औषधे लिहून दिली आहेत आणि सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे."

गोविंदाचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांना मंगळवारी सकाळपासून अशक्त आणि अस्वस्थ वाटत होते. अचानक संध्याकाळी त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर फॅमिली डॉक्टरांनी त्यांना औषध घेतली आणि विश्रांती करायला सांगितले. त्यानंतर पुन्हा 12.00 च्या सुमारास त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. अशक्तपणा जाणवला. चक्कर आल्यासारखे झाले.

रात्री गोविंदा घरी एकटे असल्यामुळे त्यांनी ललित बिंदल यांना फोन केला. मग डॉक्टरांशी संपर्क साधून गोविंदा यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर गोविंदा यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सकाळी त्यांची तब्येत सुधारली. म्हणून त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. गोविंदाची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Govinda Discharged
Veen Doghatli Hi Tutena : नव्या आव्हानांची सप्तपदी! लग्नानंतर कसा सुरू होणार समर-स्वानंदीच्या प्रेमाचा प्रवास? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com